मुंबई : अभिनेता बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असणारं व्यक्तिमत्त्व आहे. संजू बाबाच्या फिल्मी करिअरमध्ये तसचे खाजगी आयुष्यात बरेच चढ-उतार आले. मात्र या साऱ्या प्रसंगांना तो हिंमतीने सामोरं गेला. गेल्याच वर्षी संजयला फुफ्फुसांचा झाल्याचं निदान झालं होतं. त्याने स्वतः आपल्या कर्करोग झाल्याचं ट्विटद्वारे चाहत्यांना सांगितलं. मात्र आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच तो खचला. डॉ. जलील पारकर यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त संजयला जेव्हा कर्करोग झाला तेव्हा त्याची नेमकी अवस्था काय होती याबाबत सांगितले आहे. डॉ. जलील पारकर म्हणाले की, ‘जेव्हा कर्करोग झाला असल्याचं संजयला कळालं तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया होती ‘देवा हे माझ्याच नशिबी का?’. अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. हिस्टोपॅथोलॉजीचे रिपोर्ट आणि परदेशामधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याने कोकिलाबेन रुग्णालयात केमोथेरपी घेण्यास सुरुवात केली. त्याने योग्य ते उपचार सुरु ठेवले आणि लवकरात लवकर संजयने कर्करोगावर मात केली.’ गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात संजू बाबाला कर्करोग झाल्याचं सगळ्यांसमोर उघड झालं. त्याच्या कर्करोगाची बातमी कळताच चाहते मंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला. तसेच संजयचे कुटुंबिय देखील चिंतेत होते. या सगळ्या प्रसंगामध्ये संजची पत्नी मान्यता दत्तने त्याला उत्तम साथ दिली. माझा मित्र परिवार, कुटुंबिय, चाहते माझ्याबरोबर आहेत असे संजयने त्यावेळी त्याच्या एका पोस्टमध्ये देखील म्हटले होते. कर्करोगासारखा गंभीर आजाराने संजयला गाठलं. मात्र त्याने न डगमगता, न घाबरता यावर हिंमतीने मात केली. त्याच्यावर उपचार सुरु असताना तो मानसिक तसेच शारिरीक दृष्ट्या पुरता खचला. काही काळ त्याने चित्रपटांमधून ब्रेकही घेतला. पण आता संजू बाबा नव्या जोमाने कामाला लागला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cR0Xrk