Full Width(True/False)

कंगना रणौत केस- हृतिकला समन्स, २७ फेब्रुवारी द्यावं लागणार जबाब

मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री यांतील खडाजंगी थांबण्याचं नाव घेत नाहीए. त्यांच्यातील शीतयुद्ध वाढत चाललं असून आता हृतिकच्या अडचणीत वाढ झाली आहे. हृतिकने दाखल केलेल्या एका तक्रारीचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला शनिवारी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स पाठवण्यात आला आहे. हा समन्स २०१६ मधील केसशी निगडीत आहे. दोन महिन्यांपूर्वी ही केस CIU कडे देण्यात आली. हृतिकने दाखल केलेल्या या तक्रारीची चौकशी सुरुवातीला सायबर पोलीस करत होती. ऋतिकने जवळपास पाच वर्षांपूर्वी आयपीसी कलम ४१९ आणि आयई कायदा कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुनन्हा दाखल करण्यात आला होता. कंगनाशी निगडीत हा वाद अनेक महिने चर्चेत राहिला होता. दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. याचमुळे हृतिकनंतर कदाचित कंगनालाही प्रकरणाशी संबंधी चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. २०१३-१४ मध्ये हृतिक रोशनला त्याच्या मेल आयडीवर शेकडो मेल आले होते. या प्रकरणात कोणतीच प्रगती झाली नाही यासंबंधी प्रख्यात वकील महेश जेठमलानी यांनी डिसेंबर २०२० मध्ये मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे प्रकरण सायबर सेलमधून सीआययूकडे पाठवलं. कंगनाने हृतिकवर आरोप केला होता की तो तिच्यासोबत नात्यात होता पण त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर कंगनाने त्याच्यासोबतचं नातं मोडलं. यानंतर बर्‍याचवेळा दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZUDvBT