Full Width(True/False)

शेहनाज गिलसोबत गुपचूप लग्न केलं? सिद्धार्थ शुक्लाचा खुलासा; म्हणाला...

मुंबई: 'बिग बॉस'च्या मागच्या सीझनमधली लोकप्रिय जोडी म्हणजे आणि . शोमध्ये दोघांची घट्ट मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं 'खास' नात्यात रुपांतर झालं असंही बोललं गेलं. जिथे-तिथे दोघं एकत्रही दिसत असतात. अलीकडेच त्यांचं एक गाणंही प्रदर्शित झालं. आता त्यांच्याविषयीची आणखी एक बातमी समोर आली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. दोघांना सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे म्हणून त्यांनी ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे,अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चांना काही अर्थ नसल्याचं आता खुद्द सिद्धार्थ शुक्लानं म्हटलं आहे. त्यानं शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर खुलासा केलाय. लग्न झालं नसल्याचं सिद्धार्थनं स्पष्ट केलं आहे. सिद्धार्थ आणि शेहनाज यांनी लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर एका चाहत्यानं सिद्धार्थला तू खरंच लग्न केलंय का? असा प्रश्न विचारला. तसंच 'या प्रश्नाचं मला उत्तर द्या कारण, माझ्या गर्लफ्रेंडनं माझ्यासमोर एक अट ठेवली आहे. तुमचं लग्न झालंय की नाही ? हे कळणार नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाहीए',असंही तो चाहता म्हणाला. या चाहत्याला त्याच्याप्रश्नाचं उत्तर देत सिद्धार्थ त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला. 'भावा, हे बघ बिन लग्नाचं राहणं कधीही चांगलंच आहे. मी तर लग्न केलं नाहीए, माझ्या स्वत:पेक्षा लोकं मला जास्त ओळखतायत , त्यांनी माझं लग्न झाल्याचं सांगितलंय', असं सिद्धार्थ म्हणाला. दरम्यान, सिद्धार्थ आणि शेहनाज हे दोघे 'बिग बॉस १३' मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. शहनाजने सिद्धार्थसमोर तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली होती. पण सिद्धार्थ शेहनाजला त्याची चांगली मैत्रीण म्हणत आला आहे. 'बिग बॉस' संपल्यावर देखील त्यांच्यातील नातं बदललं नाही. तर, शेहनाजच्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्धार्थने तिच्यासाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात सिद्धार्थची आई देखील आली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NExE12