मुंबई: शेतकरी आंदोलनाला प्रसिद्ध पॉप गायिका , पर्यावरण कार्यकर्ती , प्रख्यात वकील मीना हॅरिस आदींनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर देशात उडालेली राळ अद्याप शांत झालेली नाही. यासंदर्भात हॉलिवूडच्या कलाकारांनी ट्विट करून मत मांडल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्यावर निशाणा साधत भारताच्या अंतर्गत चर्चेत न पडण्याचा सल्ला दिलाय. यानंतर हॉलिवूडची अभिनेत्री हिनं ()बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर टीकास्त्र सोडलं आहे. रिहानाविरोधात बोलणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना अमांडानं सुनावलं आहे. ' या मुर्खांना कोणी कामावर ठेवलं आहे, ज्यांनी हा प्रचार सुरू केलाय. एक संबंधीत व्यक्ती भारचाचं विभाजन करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे, आणि कुणी तरी यासाठी तिला पैसे देत आहे? थोडा तरी विचार करावा, विश्वासठेवण्याइतपत तरी वास्तववादीपणा ठेवा', असं अमांडानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ग्रेटासह, पॉप गायिका रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि लेखिका मीना हॅरिस यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनच्या बाजूने ट्वीट केले होते. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले होते. त्याचवेळी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडूंनी या सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालू नये, असे सांगणारे ट्वीट केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3js5baj