Full Width(True/False)

निधनाच्या एक दिवस आधी राजीव यांनी केला होता 'या' खास व्यक्तीला फोन

मुंबई- बॉलिवूड अभिनेते यांचं काल (९फेब्रुवारी २०२१) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांचे भाऊ रणधीर यांनी ताबडतोब त्यांना इस्पितळात नेलं परंतु त्यांना वाचवण्यात ते अयशस्वी ठरले. खरं सांगायचं तर, राजीव मागील काही दिवसांपासून अत्यंत खुशीत होते. त्याचं कारणही तसंच होतं. जवळपास ३० वर्षानंतर ते आशुतोष गोवारीकर यांच्या 'तुलसीदास जुनिअर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार होते. या चित्रपटाच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी ते एका मीडिया हाऊसला मुलाखतदेखील देणार होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हतं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने कपूर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजीव यांनी निधनाच्या अगोदरच्या रात्री त्यांनी त्यांच्या शाळेतील एका खास व्यक्तीला फोन केला होता. तो व्यक्ती म्हणजे त्यांचा शाळेपासूनचा जिवलग मित्र राजीव खन्ना. खरं सांगायचं तर, राजीव हे अत्यंत निर्मळ हृदयाचे होते. त्यांनी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणाऱ्यांपैकी एक माणूस म्हणजे राजीव कपूर. समोरील व्यक्तीच्या मुखावर हास्य असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरही हसू असायचं. दिग्दर्शक व अभिनेते विवेक वासवानी आणि राजीव कपूर एकाचं शाळेत होते. विवेक हे राजीव यांच्यापेक्षा एक वर्ष मोठे होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व शाळेतील मित्रांचा व्हाट्सअँपवर एक ग्रुप होता. हा ग्रुपवर सक्रिय होता. त्यावर राजीव खन्ना यांनी त्यांच्या मुलीच्या नवीन कामाविषयी एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट वाचून राजीव कपूर प्रचंड खुश झाले. त्यांनी राजीव खन्ना यांना फोन केला आणि त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या. ते दोघे बराचं वेळ फोनवर गप्पा मारत होते. त्यानंतर, राजीव यांच्या जाण्याची बातमी आली. हे वाचून राजीव खन्ना यांचा त्या बातमीवर विश्वास बसला नाही. त्यांनी त्यांच्या ग्रुपवर आपण राजीव यांच्याशी काल बोललो असल्याचे सांगितले. राजीव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसोबतचं त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. एक चांगल्या मनाचा माणूस हरपल्याच्या प्रतिक्रिया राजीव यांच्या मित्रांनी दिल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tLlrYE