Full Width(True/False)

गाडी घेतल्यानंतर सुव्रतनं घेतलाय महत्त्वाचा निर्णय; वाचून तुम्हीही कराल कौतुक

मुंबई टाइम्स टीम पर्यावरणाविषयी जागरुक असलेले अनेक कलाकार वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. अभिनेता सुव्रत जोशीनं देखील एक सुंदर विचार करत पर्यावरण जपण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यानं नुकतीच एक गाडी खरेदी केली. पण त्या गाडीचा पर्यावरणाला त्रास होऊ नये म्हणून तो 'एनर्जी ऑडिट' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे. ही संकल्पना नक्की काय आहे याबद्दल सुव्रतनं 'मुंटा'ला सांगितलं. 'मी खरंतर इलेक्र्टिक कार घेण्याचा विचार करत होतो. कारण त्यात एमिशन नसतं. त्यामुळे सगळ्यांनी इलेक्र्टिक कार घेतल्या तरी कार्बन एमिशन कमी होईलच असं नाही. म्हणूनच मी साधी पेट्रोलवर चालणारी गाडी घ्यायचं ठरवलं.' सुव्रत इथवरच थांबला नाही. तर त्यानं पेट्रोलवर चालणारी गाडी घेतल्यावरही त्याच्या एमिशनमुळे पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून काय करता येईल याचा अभ्यास करायला सुरुवात केला. 'पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांशी बोललो. त्यांनी मला एक कल्पना सांगितली. गाडी हवेत जितकं एमिशन सोडेल ते मोजून भरपाई म्हणून तेवढी झाडं लावायची', असं तो सांगतो. सुव्रतनं नाशिकमधल्या एका एनर्जी ऑडीट करणाऱ्या तरुणाकडून त्याची गाडी साधारण किती धूर सोडेल याचं गणित आखलं. त्यावरून त्यानं किती झाडं लावली की ते फायद्याचं होईल हेही सुव्रतनं त्याच्याकडून जाणून घेतलं. 'एनर्जी ऑडीट करणाऱ्या त्या तरुणानं दिलेल्या माहितीनुसार मी पुढची पाच वर्षं दर सहा महिन्यांनी साधारण १२० झाडं लावणं योग्य ठरेल असं सांगितलं. त्यानुसार मी आता योजना करणार आहे', असं तो सांगतो. '१०-१२ झाडं लावायला आणि त्यांची निगा राखण्यासाठी साधारण पाच हजार रूपये लागतात. १० लाखाची गाडी घेतल्यावर त्यातले पाच टक्के यावर खर्च करायला काहीच हरकत नाही', असं त्याचं मत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37SZRs7