Full Width(True/False)

कंगनाला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा खर्च किती? सरकारनं दिलं उत्तर

मुंबई: मागच्या वर्षी कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वादानंतर जेव्हा कंगना मुंबईमध्ये आली त्यावेळी तिला केंद्र सरकारकडून व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. कंगनानं याबाबत ट्वीट करत केंद्र सरकारचे आभार मानले होतं. कंगनाला पुरवण्यात येणाऱ्या या सुरक्षेचा एकूण खर्च किती असा प्रश्न आता सरकार विचारण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा पुरविण्यासाठी नेमका खर्च किती येतो निश्चित करणे आणि त्याची माहिती ठेवणं कठीण असल्याचं गृह मंत्रालयाने म्हटले आहे. माहितीच्या अधिकाराखाली जम्मू येथील रहिवासी रोहित चौधरी यांच्या अर्जाला उत्तर देताना कंगना किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या खर्चाचा हिशोब गृहमंत्रालय ठेवत नाही. कंगनाला मागच्या वर्षी ७ सप्टेंबरला व्हाय दर्जाची सुरक्षा केंद्र सरकारकडून पुरवण्यात आली होती. यानुसार तिला ११-१२ सुरक्षा कर्मचारी २४ तास सुरक्षा देणार. यात कंगनाला केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ)सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. ट्विटर लिंक- कंगना किंवा कोणत्याही व्यक्तीला देण्यात येणाऱ्या या सुरक्षेविषयी याविषयी गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, 'या सुरक्षेसाठी येणारा नेमका खर्च किती हे सांगणं किंवा निश्चित करणं कठीण आहे. कारण त्यात वाहतूक, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा खर्च, वाहने इत्यादींवर केला जाणारा खर्च यांचा समावेश असतो आणि हा खर्च संबंधित सुरक्षा संस्था आणि बजेट प्रमुखांकडून दिला जातो. याशिवाय काही वेळा हा खर्च राज्य सरकरकडून केला जातो. विशेषतः केंद्रशासित दौऱ्यावर असणाऱ्या व्यक्तींचा खर्च राज्य सरकार करते आणि ही खाती केंद्र सरकारच्या अंतर्गत येत नसल्यानं याच्या माहितीचं संकलन किंवा हा खर्च निश्चित करणं कठीण आहे.' जेव्हा २०१४ मध्ये बिझनेसमन मुकेश अंबानी यांना सीआरपीफ कडून 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तेव्हा त्यांनी या सुरक्षेसाठी जवळपास प्रति महिना २० लाख रुपये एवढा खर्च सरकारला दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OM7biv