Full Width(True/False)

जाणून घ्या कधी देणार करिना कपूर तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म!

मुंबई- आणि यांच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात करिना बाळाला जन्म देईल असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे करिना आणि सैफ दोघंही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असून त्यांनी काही महिन्यांपासूनच बाळाच्या आगमनाची तयारी करायला सुरुवात केली होती. एका इंग्रजी वेबसाइटच्या बातमीनुसार, साधारणपणे पुढच्या आठवड्यात करिना तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म देईल. मॅटर्निटी लीव्हवर जाण्यापूर्वी करिनाने तिची सर्व व्यावसायिक कामं संपवली होती. करिनाने या बाळाच्या आगमनापूर्वी त्याच्यासाठी घर सजवलं आहे. एवढंच नाही तर करिना आणि सैफ त्यांच्या नवीन मोठ्या घरात शिफ्ट झाले आहेत. या घरात आणि दुसऱ्या बाळासाठीच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे इथे दोन्ही मुलांसाठी स्वतंत्र रूमही आहेत. जिथे मुलं स्वतःचा वेळ घालवू शकतात. असं म्हटलं जात आहे की सैफही लवकरच त्याची सर्व कामं संपवून पॅटर्निटी लीव्हवर जाणार आहे. नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सैफने पॅटर्निटी लीव्हचं महत्त्व किती मोठं आहे याबद्दलही चर्चा केली. सैफ म्हणाला की ही एकमेव अशी सुविधा आहे ज्यात प्रत्येक वडिलांना त्यांच्या कामातून वेळ काढून तो कुटुंबाला देण्याची मुभा आहे. करिनाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, या प्रेग्नन्सीवेळी ती फारशी चिंतेत नाहीए. मात्र तैमुरवेळी तिला अधिक काळजी आणि चिंता होती. दुसऱ्या प्रेग्नन्सी ती जास्त एन्जॉय करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aJ6ihN