मुंबई: परदेशातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करताच भारतात कलाकारांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही कलाकारांनी शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गंत प्रश्न असून बाहेरच्यांनी बोलू नये, अशी भूमिका घेतली आहे. रिहानाच्या ट्विटनंतर हिनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. हॉलिवूडची अभिनेत्री हिनं ()बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर तसंत ट्रोल करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. पैसे घेऊन आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा या परदेशातील सेलिब्रिटींवर आरोप करण्यात येत आहे. हे आरोप झाल्यानंर या आरोपाचे खंडन करत मिया खलिफा आणि अमांडा यांनी सोशल मीडियावर उत्तर दिलं आहे. मिया खलिफा आणि अमांडा सर्नी यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. दोघींनीही ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलं आहे.अमांडानं नुकतंच पैसे घेऊन ट्विट केल्याच्या आरोपवर भाष्य केलं आहे. 'मस्करी करतेय...पण बरेच प्रश्न आहेत. मला कोण देतंय पैसे? कोणाला विचारायचं पैश्यांसाठी? कधी पर्यंत माझे पैसे मला मिळतील? मी जास्तच ट्विट्स केलेत, त्याचे अधिक पैसे मला मिळाणारेत का?', असं खोचक ट्विट अमांडानं केलं आहे. अमांडाच्या या ट्विटला मिला खलिफा हिनं देखील उत्तर दिलंय. 'पैसे मिळत नाहीत , तोपर्यंत ट्विट करणं थांबवणार नाही', असं तिनं म्हटलं आहे. दरम्यान, अमांडा आणि मिया यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या ट्विट्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cQK5B7