Full Width(True/False)

निया रवीला म्हणाली बेस्ट किसर, अशी होती पत्नीची प्रतिक्रिया

मुंबई- मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तिच्या बोल्ड अदांसाठी आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या दिसण्याच्या आणि भूमिकांच्या चर्चेसोबत तिच्या व्यक्तव्यांचीही चर्चा केली जाते. नियाने नुकतंच तिच्या सहकलाकाराचं कौतुक केलं आणि ते कौतुक ऐकून त्याच्या पत्नीला आश्चर्याचा धक्का बसला. नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नियाने तिचा सहकलाकार रवी दुबेला बेस्ट किसर म्हटलं. ते ऐकून रवीची पत्नी सरगुन मेहताला धक्का बसला होता. रवी आणि नियाने वेब शो '' मध्ये एकत्र काम केलं आहे. ते दोघेही त्यात मुख्य भूमिकेत आहेत. या शोसाठी दोघांनी अण्डर वॉटर किसिंग सीन दिला होता. त्या सीनच्या पार्श्वभूमीवर नियाने रवीला बेस्ट किसर म्हटलं. त्यावर रवीच्या पत्नीची सरगुनची काय प्रतिक्रिया होती हे रवीने एका मुलाखतीत सांगितलं आहे. रवीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, 'मला खूप मोठा धक्का बसला होता. मी आणि सरगुन दोघेही नियाला खूप पसंत करतो. जेव्हा आम्ही तिचा व्हिडीओ पहिला तेव्हा आम्ही दोघंही प्रचंड हसायला लागलो. आम्ही नियाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आम्हाला माहीत आहे ती कशी आहे आणि मी कसा आहे. तिने आता जे म्हटलं आणि ती नेहमीच जे बोलते ते सर्व कबुल आहे. मी ते कमेन्ट कॉम्प्लिमेण्ट म्हणून घेईन. निया फक्त निया आहे. ती जे काही बोलते ते मी सकारात्मकतेने घेतो. आमच्यात कुठलीही नकारात्मक भावना नाही.' रवीने यावेळी चित्रीकरणा दरम्यान नियाच्या वागण्याबद्दल सांगताना म्हटलं की, 'पहिल्या सीझनवेळी मी फार लाजरा होतो. पण आता असं नाहीये. या गोष्टीचं श्रेय मी नियालाच देतो. कारण अशा सीनमध्ये प्रत्येक गोष्ट मुलीवर येऊन थांबते. तिच्यावरच सारं निर्भर असतं की, ती या सीनला कशा पद्धतीने हाताळते. मी एक कलाकार आहे आणि कथेचा एक भाग म्हणून या गोष्टींचाही त्यात समावेश करावा लागतो हे मला माहिती आहे. दुसऱ्या सीझनचं संपूर्ण श्रेय मी नियाला देईन.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2P5Hdqa