Full Width(True/False)

मस्तच! Samsung Galaxy M31s च्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमत

नवी दिल्लीः स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाची कंपनीने गेल्या वर्षी जुलै मध्ये १९ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत या फोनला लाँच केले होते. हँडसेट गॅलेक्सी एम ३१चे अपग्रेड होते. यात क्वॉड रियर कॅमेरा व 6000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन ८ जीबी रॅम सोबत येतो. वाचाः Samsung Galaxy M31s भारतातील किंमत सॅमसंग गॅलेक्सी एम ३१ एस चे ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत १९ हजार ४९९ रुपयांऐवजी १८ हजार ४९९ रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २१ हजार ४९९ रुपयांऐवजी २० हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच दोन्ही व्हेरियंट्सच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ३१ एस च्या नवीन किंमती सोबत अॅमेझॉन आणि सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. यासोबतच ऑफलाइन स्टोर्सवरून फोनला नवीन किंमतीसोबत खरेदी करू शकतो. याची माहिती ९ मोबाइल्सने सर्वात आधी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy M31s चे फीचर्स ड्यूअल सिम असलेला हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड One UI वर काम करतो. या फोनला अँड्रॉयड ११ अपडेट मिळाले होते. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2400 पिक्सल) सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेसियो २०.९ आहे. हँडसेटमध्ये ऑक्टा कोर एक्सीनॉस 9611 प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम दिला आहे. या फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याला वाढवता येऊ शकते. वाचाः या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा सोनी IMX682 प्राइमरी सेंसरचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक दिले आहे. फोनच्या साइडला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 6000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kouACn