Full Width(True/False)

करोनामुळे आमिर खान 'ते' समीकरण मोडणार? सिनेविश्वात चर्चा

मुंबई : चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी खेचणारा आणि तिकीटबारीवर कोट्यवधी कमाई करून देणारा अभिनेता यंदा तीन सिनेमांवर काम करतोय. वर्षाला एकच चित्रपट करण्याच्या अलिखित नियमाचं पालन आमिर करत होता. पण गेलं वर्ष इतर अनेक कलाकारांप्रमाणे आमिरचासुद्धा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे यावर्षी तो एकाच वेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमिर खानने २०१९मध्ये ‘’ या चित्रपटाची सुरुवात केली होती. करोना संकटामुळे सिनेमाचं चित्रीकरण रखडलं. अखेर गेल्या वर्षी टाळेबंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणाला आमिरने सुरुवात केली. आता या वर्षी नाताळच्या मुहूर्ताला चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्याचा विचार आहे. त्यासह तो नवीन कोणत्या चित्रपटावर काम सुरू करणार याची चर्चा सुरू आहे. यात प्राधान्याने चर्चा सुरू आहे ती ‘’ या चित्रपटाची. हा चित्रपट टी सीरिज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांच्यावर आधारित आहे. या वर्षी मे महिन्यानंतर याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जातंय. या शिवाय २०१८ साली हिट झालेल्या ‘’ (चॅम्पिनयन) या स्पॅनिश चित्रपटाच्या रिमेकचाही विचार मिस्टर परफेक्शनिस्ट करत आहे. पण या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे एका वेळी तीन चित्रपटांविषयी आमिरची बोलणी सुरू आहेत. प्रत्यक्षात तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एका वेळी एकच चित्रपट करणार यात शंका नाही. पण पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचं समीकरण आता यापुढे राहणार नाही, अशी सिनेविश्वात चर्चा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZhHTL2