Full Width(True/False)

करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट डब्यात? वाचा यामागचं कारण काय

मुंबई : दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या मल्टीस्टारर ‘तख्त’ चित्रपटाची गेल्या वर्षी अधिकृत घोषणा करण्यात आली. आणि तिथपासूनच या चित्रपटाच्या चर्चांनी जोर धरला. बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार या चित्रपटात दिसणार म्हणून प्रेक्षक ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले आणि आता तर ‘तख्त’ला ब्रेक लागला असल्याचं समजतंय. करणने या चित्रपटाचं काम थांबवलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला स्टुडिओ मिळणं कठीण झालं आहे. शिवाय ऐतिहासिक कथेवर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे सध्यातरी चित्रपटाच्या कथानकामुळे कोणता वाद निर्माण होऊ नये असे करणला वाटते. काही वर्षांनी हा चित्रपट बनवण्यावर करण विचार करणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘तख्त’चे लेखक हुसैन हैदरी यांनी हिंदू धर्माबाबत एक वादग्रस्त ट्विट केले होते. हुसेन यांच्या या विधानामुळे बायकॉट ‘तख्त’ हे हॅशटॅश सोशल मीडियावर ट्रेण्ड होत होतं. आता पुन्हा एकदा नव्या कोणत्या कारणामुळे चित्रपटावर टीका होऊ नये असे करणचं म्हणणं आहे. करणचा हा मल्टीस्टारर चित्रपट औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा सिकोह याच्यावर आधारित होता. मात्र आता तात्पुरता तरी हा चित्रपट डब्यात गेला असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग औरंगजेब तर विकी कौशल दारा सिकोहची भूमिका साकारणार होता. तसेच अनिल कपूर, करिना कपूर खान, आलिया भट्ट, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आदी कलाकार ही या चित्रपटात काम करताना दिसणार होते. मात्र आता या चित्रपटाचे कामच बंद झाले आहे. पण अद्यापही करणने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चित्रपटाबाबत सुरु असलेल्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे करणने सांगितल्यावरच स्पष्ट होईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36ENiQx