Full Width(True/False)

आई आणि नंतर बॉयफ्रेंडच्या जाण्याने नैराश्यात होती संजय दत्तची मुलगी

न्यूयॉर्क- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' या सत्रादरम्यान अभिनेता त्रिशाला दत्तने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या. प्रश्नांची उत्तरं देताना त्रिशाने तिच्या आयुष्यातील असे काही कठीण अनुभव सांगितले ज्यामुळे ती पूरती मनातून तुटली होती आणि त्यातून पुन्हा वर येणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. त्रिशाला म्हणाली की ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीचा आदर करते. आपल्या सर्वांनाच अपघात, आजार, नुकसान किंवा इतर कोणत्याही प्रकारचं दुःख आयुष्यात येऊ नये अशी आशा असते. पण दुर्दैवाने असे काही लोक आहेत जे आयुष्यभर अशाच प्रकारच्या संकटांशी झुंज देत असतात. माझा असा विश्वास आहे की या परिस्थितीत निराश होऊ नये. कठीण काळ किंवा दु: खदेखील एखाद्या व्यक्तीसाठी शिकण्याची चांगली संधी असू शकते. वाईट अनुभवांनंतर आपलं आयुष्य आणि विचारसरणी पूर्ण बदलते आणि आपण आधीपेक्षा जास्त कणखर होऊन आयुष्य जगू लागतो. त्रिशाला पुढे म्हणाल की, 'मला कठीण काळात एक मार्ग सापडला आहे जो मला सर्वसामान्य आयुष्य जगत असताना सापडत नाही. संकटातून बाहेर पडत असतानाच स्वतःचा विकासा सुरू झाला आणि मी पुढे जाऊ शकले. आयुष्यात जेवढी संकटं आली त्यातून मी त्या सर्वांना एक संधी म्हणून स्वीकारलं आणि माझ्या आयुष्याचा अर्थ शोधण्यास सुरुवात केली. या सर्वांनी मला पूर्वीपेक्षा जास्त चांगली व्यक्ती केलं.' त्रिशाला म्हणाली की, 'मी दुःखात शांत राहायला शिकलो आणि आयुष्यातील अडचणी टाळण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करण्यास शिकले. माझं ध्येय दुःखाला आयुष्यातून काढून टाकण्याचं कधीच नव्हतं. कारण ते नेहमीच आपल्यासोबत असतं. माझे ध्येय दुःखाला कशाप्रकारे हाताळता येईल यावर हे शिकणं होतं आणि आता मी ठीक आहे.' त्रिशाला दत्तने २०१९ मध्ये आपला प्रियकर गमावला होता. प्रियकराच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिशालाने लिहिले होते की, लहान वयात आई गमावल्यानंतर मला त्याला गमवायचं नव्हतं. त्रिशला ही संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची ऋचा शर्माची मुलगी आहे. संजयने ऋचाशी १९८७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिला ब्रेन ट्यूमरसारखा आजार झाला. १० डिसेंबर १९९६ रोजी ऋचाचं अमेरिकेत निधन झालं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jdeFX1