मुंबई- बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड गुन्हेगारीवर आधारित चित्रपटांना अधिक पसंती दिली जाते. '' हा असाच एक चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आणि स्टारर चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. या टीझरमुळे अ‍ॅक्शनपटाची कथा नक्की काय असेल याचाही अंदाज येतो. या चित्रपटात जॉन अब्राहम अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत आहे तर इम्रान हाश्मी त्याच्यामागे पोलीस अधिकारी म्हणून काम करताना दिसणार आहेत. टीझर पाहून हा एक तुफान अॅक्शनपट असेल याचा अंदाज येतो. इथे पाहा 'मुंबई सागा'चा टीझर- या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी व्यतिरिक्त सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'मुंबई सागा' चे लेखक आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी केलं असून भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या १९ मार्च २०२१ रोजी 'मुंबई सागा' सिनेमा देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bzPo5N