Full Width(True/False)

वोडाफोन-आयडिया युजर्संना झटका, महाराष्ट्रासह 'या' ४ राज्यात हे प्लान झाले महाग

नवी दिल्लीः : टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांना झटका दिला असून काही प्लान्स महाग केले आहेत. हे प्लान चार टेलिकॉम सर्कलमध्ये महाग केले आहेत. Vi 598 Plan आणि Vi 699 Plan प्लान च्या किंमतीत वाढ झाली आहे. हे प्लान आधी पूर्व यूपी सर्कलमध्ये महाग होता. वाचाः या सर्कलमध्ये झाले प्लान महाग तामिळनाडू, चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा टेलिकॉम सर्कलमध्ये राहणाऱ्या युजर्संना आता ५९८ रुपये आणि ६९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लान्ससाठी आता ६४९ रुपये आणि ७९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचाच अर्थ ५९८ रुपयांचा प्लान ५१ रुपयांनी तर ६९९ रुपयांची प्लान १०० रुपयांनी महाग झाला आहे. वाचाः ६४९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडिया फॅमिली पोस्टपेड प्लान सोबत दोन कनेक्शन ऑफर केले जातात. एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. या प्लानमध्ये एकूण ८० जीबी डेटा दिला जातो. ५० जीबी प्रायमरी कनेक्शन आणि ३० जीबी सेकंडरी कनेक्शन युजर्ससाठी. प्रायमरी कनेक्शन युजर्सला २०० जीबी पर्यंत डेटा कॅरी फॉरवर्ड आणि सेकंडरी युजर्सला ५० जीबी पर्यंत डेटाला कॅरी फॉरवर्ड करू शकता. डेटाशिवाय अन्य बेनिफिट्स मध्ये दोन्ही कनेक्शन युजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय प्रतिमहिना १०० एसएमएस मिळते. वोडाफोन आयडिया ग्राहकांना या प्रीपेड प्लानमध्ये तीन कनेक्शन मिळते. यात पहिल्या कनेक्शनवर १२० जीबी, दुसऱ्या कनेक्शनवर ३० जीबी आणि तिसऱ्या कनेक्शनवर ३० जीबी डेटा दिला जातो. तसेच युजर्संला पहिल्या कनेक्शनवर २०० जीबी डेटा आणि अन्य दोन कनेक्शवर ५० जीबी डेटा रोलओवरची सुविधा उपलब्ध आहे. वाचाः वोडाफोनचा ७९९ रुपयांचा प्लान ८०० रुपयांपेक्षा कमी असलेल्या या प्लानसोबत तीन कनेक्शन ऑफर केले जातात. प्रायमरी आणि दोन सेकंडरी कनेक्शन. या प्लानमध्ये एकूण १२० जीबी डेटा दिला जातो. प्रायमरी युजर्ससाठी ६० जीबी डेटा आणि प्रत्येक सेकंडरी युजरला ३० जीबी डेटा दिला जातो. या प्लानसोबत ६४९ रुपयांचा प्लान समान डेटा रोलओवर केला जातो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रत्येक कनेक्शनच्या युजर्सला प्रतिमहिना १०० एसएमएस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36M4NOR