Full Width(True/False)

पॅन कार्ड आणि आधार कार्ड पैसे न देता 'असे' करा लिंक, ३१ मार्च लास्ट डेट

नवी दिल्लीः देशात पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक आवश्यक प्रोसेस आहे. जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न करीत असाल तर तुमच्यासाठी हे फार गरजेचे आहे. याशिवाय, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. वाचाः पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन पद्धतीने लिंक करता येऊ शकते. जाणून घ्या डिटेल्स. १. सर्वात आधी इन्कम टॅक्स ई-फाइलिंग वेबसाइटद्वारे पॅन-आधार लिंक करण्याची पद्धत २. 567678 किंवा 56161 वर SMS पाठवून. १) ई-फाइलिंग वेबसाइटद्वारे करण्याची पद्धत जाणून घ्या. स्टेप पहिलीः सर्वात आधी इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर जा. स्टेप दुसरीः आधार कार्डमधील नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर एन्टर करा. स्टेप तिसरीः आधार कार्डमध्ये केवळ जन्मतारीखची वर्ष मेंशन असल्यास स्क्वॉयर टिक करा. स्टेप चौथीः आता कॅप्च कोड एन्टर करा. कॅप्चा कोडच्या जागी ओटीपी रिक्वेस्ट पाठवू शकता. ओटीपी त्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. स्टेप पाचवीः आता लिंक आधार बटनवर क्लिक करा. २) SMS पाठवून पॅनला आधारला लिंक करण्याची पद्धत स्टेप पहिलीः आपल्या फोनवर टाइप करा. UIDPAN <12 अंकाच्या Aadhaar नंबर लिहा> <10 अंकाचा पॅन नंबर लिहा. स्टेप दुसरीः आता स्टेप १ मध्ये सांगितलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. फॉर्म भरून पॅन-आधार लिंक करण्याची पद्धत तुम्ही NSDL पॅन सर्विस प्रोवाइडर कडे जाऊन मॅन्यूअली पॅनला आधार कार्डशी लिंक करू शकता. या प्रोसेसरला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील. पॅन कार्ड आधार कार्ड लिंकच्या स्टेट्सला असे चेक करा स्टेप पहिलीः इनकम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्या ठिकाणी Aadhaar Status वर क्लिक करा. किंवा incometaxindiaefiling.gov.in/aadhaarstatus लिंक वर क्लिक करा. स्टेप दुसरीः आता आपला आधार आणि पॅन कार्ड नंबर एन्टर करा. स्टेप तिसरीः ‘View Link Aadhaar Status’वर क्लिक करा. याशिवाय तुम्ही एसएमएस द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक स्टेट्स चेक करू शकता. तुम्हाला खाली दिलेल्या फॉर्मेटमध्ये एसएमएस लिहून 567678 किंवा 56161 नंबरवर पाठवा. UIDPAN < 12 अंकी आधार नंबर > < 10 अंकांचा पॅन नंबर > वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MqpMQb