मुंबई- काल रात्री गर्दीत अशा प्रकारे अडकली की तिला तिथून बाहेर काढणं कठीण झालं होतं. याआधीही फिल्मी स्टार्ससाठी चाहत्यांचा वेडेपणा बर्याचदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळचं दृश्यही काही वेगळं नव्हतं. गर्दीची संधी साधून एकाने दीपिकाची पर्स खेचण्याचाही प्रयत्न केला. दीपिका पादुकोण हिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, दीपिकाला पाहण्यासाठी रेस्तराँच्या बाहेर बरीच गर्दी जमा झाली होती. त्या रेस्तराँमध्ये दीपिका जेवायला गेली होती. पण जेव्हा दीपिका बाहेर पडली तेव्हा जमा झालेली गर्दी पाहून घाबरली. पण तिला गर्दी पार करूनच गाडीपर्यंत जावं लागणार होतं. त्यामुळे गर्दीला टाळण्याचाही पर्याय दीपिकाकडे नव्हता. या व्हिडीओमध्ये दीपिकाजवळ टिश्यू पेपर विकणार्या काही महिलाही दिसत आहेत. या महिला तिला टिश्यू पेपर विकत घेण्यास सांगत आहेत. दीपिकाचे बॉडीगार्ड जेव्हा तिला गर्दीतून सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोणीतरी तिच्या हातातली बॅग खेचण्याचा प्रयत्न करताना दिसलं. पण दीपिकाने आपली बॅग घट्ट पकडली होती. दीपिकाच्या सुरक्षा रक्षकांनी नंतर लगेच कारवाईही केली. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती '८३' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती शकुन बत्रा दिग्दर्शित सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालं नसलं तरी सिनेमात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या सिनेमाशिवाय ती 'पठाण' सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती शाहरुख खान आणि जॉन अब्राहमदेखील आहेत. या सिनेमाच्या शूटसाठी दीपिका लवकरच दुबईला रवाना होणार आहे. यानंतर दीपिका सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' सिनेमात काम करणार आहे. यात ती हृतिक रोशनसोबत अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bDU9LH