मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री पुढील संकट काही संपायला तयार नाहीयेत. ती सध्या दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या '' या वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या वेब सीरिजबद्दल आधीपासूनच अनेक वादविवाद होताना दिसत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, 'अनामिका' च्या सेटवर काही गुंडांनी राडा घातल्याचं वृत्त आहे. त्या गुंडांनी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याकडे ३८ लाख रुपयांची मागणी केली आहे. विक्रम भट्ट हे याआधी दिग्दर्शक अब्बास अली मोघल यांच्यासोबत काम करत होते. परंतु काही कारणांमुळे त्यांनी अब्बास यांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर हे प्रकरण इतकं मोठं झालं की सेटवर गुंडच आले. विक्रम यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'मी प्रचंड घाबरून गेलो. मला कळत नव्हतं की काय करू. त्यावेळी माझ्यासाठी सनीची सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची होती. सेटवर आलेल्या गुंडांनी मला चेकचे फोटो अब्बास यांना पाठवायला संगितले. जे मी त्यांना देणारचं होतो. परंतु, त्यानंतर एक मुर्तजा नामक व्यक्ती माझ्याकडे चेकची मागणी करू लागला.' या सर्व प्रकारामुळे वेब सीरिजचं त्या दिवसाचं चित्रीकरण बंद करावं लागलं. विक्रम हे अब्बास यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. त्यावर अब्बास यांनी सांगितलं, 'यावर मी काय बोलणार. हे प्रकरण फायटर असोसिएशनकडे गेलं आहे. ते योग्य तो निर्णय घेतील.' या आधीही सनीविरुद्ध केरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तिला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. पैसे घेऊनही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने ही तक्रार करण्यात अली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Oy8YYn