Full Width(True/False)

CoWIN App: काय आहे CoWIN अॅप, कसे करतात रजिस्ट्रेशन, जाणून घ्या

नवी दिल्लीः CoWIN App: ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने Covid-19 च्या दोन लशींना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक व्हॅक्सिनची पूर्तता करण्यासाठी तयार आहे. याला सर्वात आधी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वरील लोकांना ते दिले जाणार आहे. यानंतर केंद्र सरकारने नावाची घोषणा केली आहे. वाचाः केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी २३ डिसेंबर २०२० रोजी CoWIN सिस्टमला मजबूत करण्याचे म्हटले होते. ही लस रोलआउट करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे. प्रसाद यांनी टॉप टू कंटेस्टेंट साठी ४० लाख रुपये आणि २० लाख रुपयांच्या रोख पुरस्काराची घोषणा सुद्धा केली होती. जाणून घ्या CoWIN App संबंधी सर्वकाही. CoWIN App ची उपलब्धता सध्या CoWIN App कार्यात्मक नाही. परंतु, गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून डाउलनोड करण्यात येऊ शकतो. सध्या हे काही कामाचे नाही. त्यामुळे अशा कोणत्याही नावाच्या अॅपपासून स्वतःला दूर ठेवा. हे फेक असू शकते. हे सध्या प्री प्रोडक्ट स्टेजमध्ये आहे. यात हेल्थ ऑफिशियल्सचा डेटा ज्यात सर्वात आधी ज्यांना लस दिली जाणार आहे. यात ७५ लाख हेल्थ ऑफिशियल्सचा समावेश आहे. CoWIN २.० ला लवकरच भारतीय नागरिकांसाठी आणले जाण्याची शक्यता आहे. वाचाः CoWIN चे कसे करायचे रजिस्टर सध्या सर्वसामान्य जनतेसाठी करोना वायरसची लससाठी रजिस्टर करू शकत नाही. कारण, सध्या अधिकाऱ्यांना याचा वापर करता येतो. एकदा हे अॅप सुरू झाले की याच्या चार मॉडल असणार आहे. ज्यात युजर अॅडमिनिस्ट्रेशन मॉड्यूल, बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन, वॅक्सिनेशन आणि बेनिफिशियरी एक्नोलेजमेंट, स्टेटे्स अपडेशनचा समावेश होणार आहे. ज्यावेळी हे लाइव्ह होईल त्यावेळी CoWIN App किंवा वेबसाइटवरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीन पर्याय असेल. यात सेल्फ रजिस्ट्रेशन, इंडिविज्युअल आणि बल्क अपलोडचा समावेश असेल. यासाठी लॉजिस्टिक्सला सध्या जारी करण्यात आले नाही. त्यामुळे असे होऊ शकते की, सरकारकडून कॅम्पस लावले जातील. याशिवाय, सर्वेशक आणि जिल्हा प्रशासनाकडून लोकांचे रजिस्ट्रेशन एकत्र करून घेतले जातील. वाचाः पाहा कोणत्या डॉक्यूमेंट्सची लागणार गरज लोकांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी फोटो ओळखपत्र आवश्यक असणार आहे. यात आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड सह अन्य गोष्टीचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणा केली होती की, वॅक्सिनेशन फ्रंटलाइन वर्क्ससाठी फ्री असणार आहे. सर्वसामान्य जनतेसाठी याची किती फी असणार आहे. याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aUtyuA