Full Width(True/False)

Tandav Case: देवी- देवतांची थट्टा उडवणं म्हणजे अभिव्यक्ती नाहीच

मुंबई- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची वेब सीरिज '' यावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीए. गुरुवारी अलाहाबाद हायकोर्टाने अ‍ॅमेझॉन प्राइमची भारताची प्रमुख यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती, यात 'तांडव' निर्मात्यांच्या विरोधात विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीत अपर्णा पुरोहित यांच्यावर यूपीच्या पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवणं, हिंदू देवतांचां अपमान करणं आणि पंतप्रधानांची भूमिका चुकीची दाखवल्याचा आरोप केला आहे. धार्मिक भावना दुखावणं आणि जातींमध्ये दुरावा निर्माण करणं अपर्णा पुरोहित यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना न्यायमूर्ती सिद्धार्थ म्हणाले की, 'एकीकडे चुकीच्या पद्धतीने व्यक्तिरेखा साकारत मोठ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि दुसरीकडे उच्चवर्णीय आणि दलित यांच्यातील अंतर वाढवण्याचं काम करण्यात आलं आहे. राज्याचं कर्तव्य समाजाला सामाजिक, सांप्रदायिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र आणून देश जोडण्याचं काम करणं हा आहे. देवी- देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवून पैसे कमावू पाहतात कोर्टाने पुढे म्हटलं आहे की, 'असे लोका बहुसंख्यांक समुदायाच्या देवी- देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवून पैसे कमावू पाहत आहेत आणि देशाच्या उदारमतवादी आणि सहनशील परंपरेचा फायदा उचलू पाहत आहेत.' दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने सांगितले की, 'घटनेची मूलभूत संकल्पना अशी आहे की लोक इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्याशिवाय स्वतंत्र्याने आपल्या धर्माचं पालन आणि प्रसार करू शकतात. म्हणूनच, काल्पनिक कथा बनवताना दुसर्‍या धर्माच्या भावनांचा आदर करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.' काय आहे संपूर्ण प्रकरण- 'तांडव' वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. यासंबंधी देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता. अनेक हिंदू संघटनांनी विविध ठिकाणी निषेध नोंदविला होता. १८ जानेवारी रोजी लखनऊमध्ये हजरतगंज कोतवाली येथील निरीक्षक अमरनाथ वर्मा यांच्या तपासाअंतर्गत समाज आणि इतर घटकांमध्ये द्वेष आणि अशांतता पसरविण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपर्णा पुरोहितशिवाय दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू कृष्णा मेहेर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bFAawf