नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी LG ने भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन्स LG W41, LG W41+ आणि LG W41 Pro ला भारतात लाँच केले आहे. या लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले डिझाइन दिली आहे. नवीन स्मार्टफोन्समध्ये गुगल असिस्टेंट बटन दिले आहे. तिन्ही स्मार्टफोन्ससंबंधी सविस्तर जाणून घ्या. वाचाः फोनच्या किंमती LG W41 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची भारतातील किंमत १३ हजार ४९० रुपये आहे. तर LG W41+ च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १४ हजार ४९० रुपये आहे. LG W41 Pro मॉडलच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ४९० रुपये आहे. फोनला दोन व्हेरियंट कलर मध्ये लेजर ब्लू आणि मॅजिक ब्लू या दोन रंगात खरेदी करता येऊ शकते. वाचाः फोनची फीचर्स सॉफ्टवेयर आणि डिस्प्ले: ड्यूअल सिम (नॅनो) च्या एलजी फोन अँड्रॉयड १० वर आधारित क्यू ओएस वर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा (720x1,600 पिक्सल) एचआईडी फुल विजन डिस्प्ले दिला आहे. रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसरः स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी २.३ गीगाहर्ट्ज मीडियाटेक हीलियो जी ३५ ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. LG W41 मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, LG W41+ मध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि LG W41 Pro मध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. वाचाः कॅमेरा सेटअपः फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी तिन्ही फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीः फोनमध्ये ४ जीबी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, जीपीएस, ए जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37Ezype