Full Width(True/False)

ड्यूअल रियर कॅमेऱ्याचा Moto E6i स्मार्टफोन या जबरदस्त फीचर्ससोबत लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः Price, Specifications: हँडसेट निर्माता कंपनी मोटोरोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Moto E6i लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड गो वर काम करतो. यात फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे दोन रियर कॅमेरे दिले आहेत. जाणून घ्या या फोनच्या संबंधी. वाचाः Moto E6i ची खास वैशिष्ट्ये मोटोरोलाच्या या फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि फोनच्या फ्रंटमध्ये नॉचची झलक पाहायला मिळत आहे. मोटोरोला फोन अँड्रॉयड १० (गो एडिशन) आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी फोनमध्ये युनिसॉक टायगर SC9863A चिपसेट सोबत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. वाचाः या फोनमध्ये मागील बाजुस ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. सिक्योरिटीसाठी मोटोच्या या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक, ४ जी एलटीई, वाय फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ वर्जन 4.2 आणि डुअल-सिम सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 3000 mAh ची बॅटरी दिली आहे. मायक्रो यूएसबी पोर्ट द्वारे १० वॉट पर्यंत चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः मोटोरोला ब्रँडच्या या स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. फोनला दोन कलर मध्ये आणले आहे. ग्रे आणि पिंक. मोटोरोला कंपनीने या फोनला सध्या ब्राझीलमधील बाजारात लाँच केले आहे. या लेटेस्ट स्मार्टफोन अन्य मार्केटमध्ये कधीपर्यंत लाँच करण्यात येणार यासंबंधी कंपनीकडून अद्याप काहीही सांगण्यात आले नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tPx3d8