नवी दिल्लीः मोटोरोला आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. एक नवीन लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी भारतात लाँच करणार आहे. टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दावा केला आहे की, नवीन मोटोरोला स्मार्टफोनध्ये 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे. आधी आलेल्या एका लीक रिपोर्टमधून ही माहिती समोर आली होती. वाचाः याशिवाय, टिप्स्टरने दावा केला आहे की, मोटो ई ७ पॉवर ला मीडियाटेक हीलियो जी २५ चिपसेट सोबत लाँच केले जाणार आहे. लीक स्पेसिफिकेशन वरून हेही उघड झाले आहे की, फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर असू शकतो. सध्या या डिव्हाइसच्या लाँचिंग तारखे संदर्भात काहीही माहिती समोर आलेली नाही. जाणून घ्या मोटो ई ७ पॉवर स्मार्टफोनसंबंधी. भारतात कधी लाँच होणार, त्याची वैशिष्ट्ये काय असणार, यासंबंधी सर्वकाही जाणून घ्या. वाचाः मोटोरोला भारतात Moto E7 Power स्मार्टफोन लाँच करणार आहे. नवीन लीकच्या माहितीनुसार, डिव्हाइसमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर दिला जाणार आहे. टिप्स्टरने दावा केला आहे की, या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. Moto E7 Power पॉवरला भारतात लाँच करण्यासंबंधीची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनी लवकरच या संबंधीची घोषणा करू शकते. वाचाः Moto E7 Power चे फीचर्स Moto E7 Power एक एन्ट्री लेवल स्मार्टफोन असणार आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असणार आहे. यात पुढील भागात एक वॉटरड्रॉप नॉच दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय, फोनला २ जीबी रॅम प्लस ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत लाँच केले जाऊ शकते. हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. मोटोरोलच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार असून या फोनमध्ये अँड्रॉयड १० दिले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3akWMmj