Full Width(True/False)

OTT कंटेन्टसाठी नवी नियमावली! प्रकाश जावडेकर म्हणाले..

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांमुळे मागच्या काही काळापासून सातत्यानं वाद होताना दिसत आहे. या प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टसाठी कोणतेही कायदेशीर नियम किंवा सेन्सॉर बोर्ड नाही. त्यामुळे आता या प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेन्टला काही प्रकारचे निर्बंध घालण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी मागच्या काही काळापासून करण्यात येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं आणि लाइव्ह स्ट्रिमिंग कंटेन्टसाठी नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री यांनी दिली. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म दाखवल्या जाणाऱ्या बऱ्याच वेब सीरिजबद्दल आमच्याकडे मागच्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी येत आहेत. या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणारे चित्रपट, वेब सीरिज, डिजिटल न्यूजपेपर हे प्रेस कॉन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा किंवा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेन्टसाठी नवी नियमावली लागू करण्यात येईल.’ अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या वेब सीरिज ‘तांडव’ आणि 'मिर्झापूर'मुळे सोशल मीडियावर बरेच वाद झाले. वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या विरोधात अनेक राज्यांमधून एफआयआर दाखल करण्यात आल्या. या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वेब सीरिजबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय प्रकाश जावडेकर यांनी १ फेब्रुवारीपासून देशभरात कोविड-१९ च्या नियमावलीचे पालन करत १०० टक्के प्रेक्षक क्षमतेवर चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचीही माहिती दिली आहे. मात्र करोनाशी निगडीत नियमांचे पालन करणं प्रेक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे. शिवाय चित्रपटगृहांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी दोन शोच्या वेळेमध्ये अंतर ठेवण्यात येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MDuBFE