नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर ग्राहकांसाठी टेक्नो या जागतिक प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅण्डने Tecno Sale आणला आहे. टेक्नोचा हा सेल १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांना १२ ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान फ्लिपकार्टवर स्पार्क, कॅमॉन व पोवा अशा टेक्नोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देण्यात येणार आहे. वाचाः टेक्नो पोवा स्मार्टफोन टेक्नो पोवाच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनमध्ये हेलिओ जी८० प्रोसेसरसह ६,००० एमएएच क्षमतेची बॅटरी, १८ वॅट ड्युअल आयसी फास्ट चार्जर, ६.८ इंच डॉट-इन-डिस्प्ले आणि ४ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आहे आणि या स्मार्टफोनची किंमत फक्त १०,४९९ रूपये आहे. या फोनला ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये एआय क्वॉड रिअर कॅमेरासह (१६ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + एआय लेन्स) ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. वाचाः टेक्नो स्पार्क ६ गो स्मार्टफोन टेक्नो स्पार्क ६ गो हा लोकप्रिय स्पार्क सीरीजमधील भारतातील पहिला किफायतशीर ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस डॉट-नॉच डिस्प्ले, मोठी ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. १३ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरासह ड्युअल फ्लॅशलाइट आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल एआय सेल्फी कॅमेरासह मायक्रो स्लिट फ्रण्ट फ्लॅश देखील आहे. या फोनला ८ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. वाचाः टेक्नो स्पार्क पॉवर २ स्मार्टफोन ग्राहक टेक्नोच्या स्पार्क पॉवर २ एअर या स्मार्टफोनमध्ये ६,००० एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह एआय पॉवर चार्जिंग व सेफ चार्जिंग, मोठी ६.९५ इंच डॉट-नॉच डिस्प्ले आणि १३ मेगापिक्सल एआय समर्थित क्वॉड कॅमेरासह स्टिरिओ साऊंड असलेले ड्युअल स्पीकर्स. या स्मार्टफोनची किंमत फक्त ७,९९९ रूपये आहे. हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. वाचाः टेक्नो कॅमॉन १६ स्मार्टफोन टेक्नो कॅमॉन १६ स्मार्टफोनला ११ हजार ४९९ रूपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वॉड कॅमेरासह आय ऑटो फोकस वैशिष्ट्य आणि टीएआयव्हीओएसने प्रीमियम एआय-सक्षम अल्ट्रा नाइट लेन्स आहे. या डिवाईसमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डॉट-इन डिस्प्ले दिला आहे, जो १६ मेगापिक्सल एआय फ्रण्ट कॅमेरा व लाइट सेन्सर देतो. स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ ६७० प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3agduDf