Full Width(True/False)

Twitter चे नवीन फीचर आले, आता व्हॉइस मेसेज आणि व्हाइस ट्विट करता येणार, कसे पाहा

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म देशात आज अनेकांसाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. मोठ-मोठे नेते, अभिनेते, खेळाडू, आणि कंपन्या आपली महत्त्वाची माहिती ट्विट करून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नुकतेच आपल्या युजर्ससाठी डायरेक्ट मेसेज मध्ये व्हाइस मेसेज फीचर आणले आहे. भारतातील युजर्संना या फीचर्सचा लाभ मिळणे सुरू होईल. कंपनीने या फीचरला सध्या केवळ तीन देशात आणले आहे. भारत, जपान आणि ब्राझीलमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. वाचाः भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे. आम्‍ही देशात डीएम प्रयोगामध्‍ये वॉईस मेसेजेस् सुविधा आणण्‍यासाठी आणि लोकांना अभिव्‍यक्‍त करण्‍याचा नवीन मार्ग देत एखाद्या व्‍यक्‍तीचा आवाज ऐकत बारकावे, भावना व सहानुभूतीच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत, असे ट्विटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनिष महेश्‍वरी म्‍हणाले. प्रत्‍येक वॉईस मेसेज जवळपास १४० सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. टेक्‍स्‍ट मेसेजच्‍या माध्‍यमातून अनेक गोष्‍टी सांगण्‍याच्‍या राहू शकतात किंवा त्‍यामध्‍ये अडथळा येऊ शकतो. म्‍हणून वॉईस मेसेजसह ट्विटरची श्रोते व कथाकारांसाठी अधिक मानवी अनुभव निर्माण करण्‍याची इच्‍छा आहे. वाचाः डीएममध्‍ये वॉईस मेसेज कसा पाठवावा? हँड्स-फ्री अनुभवासाठी डीएम संवादामध्‍ये रेकॉर्डिंगला सुरूवात करण्‍याकरिता एकदाच नवीन वॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा. मेसेज बोलून झाल्‍यानंतर स्‍टॉप आयकॉनवर टॅप करा आणि तुम्‍हाला मेसेज पाठवण्‍यापूर्वी किंवा डिलिट करण्‍यापूर्वी रेकॉर्ड केलेला संदेश ऐकण्‍याचा पर्याय उपलब्‍ध होईल. तसेच, आयओएसवर तुम्‍ही वॉईस रेकॉर्डिंग आयकॉन धरून राहत जलदपणे मेसेज पाठवू शकता आणि बोलून झाल्‍यानंतर त्‍वरित संदेश पाठवण्‍यासाठी स्‍वाइप अप करू शकता. कोणीही ट्विटरचा वापर केल्‍यानंतर हे संदेश कुठेही ऐकू शकतील. पण, डीएमवर वॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍याची सुविधा फक्‍त भारत, जपान व ब्राझीलमधील आयओएस व अँड्रॉईडचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ट्विटरवर उपलब्‍ध असेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pw3pGo