मुंबई- गेल्या संपूर्ण वर्षात अभिनेत्री हिच्या नावाची जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा कोणत्याच सेलिब्रिटीची झाली नाही. याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर रिया आणि तिच्या भावाला शौविक चक्रवर्तीला तुरुंगात जावं लागलं होतं. आता तिचं आयुष्य हळूहळू ट्रॅकवर येत आहे. अलीकडे अभिनेत्री आणि तिचा भाऊ दोघांना वर्कआउटनंतर जिममधून बाहेर येताना पाहिलं गेलं. ती जिममधून बाहेर येताच छायाचित्रकारांनी रियाभोवती घेराव घातला. व्हिडिओमध्येही तिच्या भोवतालचा छायाचित्रकारांचा घेराव स्पष्ट दिसतो. ते सर्व रियाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण छायाचित्रकारांनी सतत हाक मारूनही रिया कुठेही न थांबता सरळ गाडीत जाऊन बसते. रियाचा हा व्हिडिओ ई-टाइम्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युझर्सने या व्हिडिओवर बर्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. रियासाठी तिचा जवळचा मित्र रूमी जाफरीने सांगितलं होतं की ती बॉलिवूडमध्ये येण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. २०२१ मध्ये चेहरे सिनेमाच्या माध्यमातून ती कमबॅक करणार आहे. सुशांतच्या निधनानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. यात त्यांच्यावर अभिनेत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यासह, ड्रग्ज संबंधित प्रकरणात अभिनेत्री महिनाभर तुरुंगात होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Yy9MOy