Full Width(True/False)

Video: धर्मेंद्र यांनी फार्महाऊसवर मजूरांसोबत मारल्या गप्पा

मुंबई: दिग्गज अभिनेता यांच्या चित्रपटांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं. त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. सध्या धर्मेंद्र मोठ्या पडद्यापासून दूर त्यांच्या फार्महाऊसवर शेती करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवरील कामचे, शेतीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. आताही त्यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर फार्महाऊसवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते फार्महाऊसवर काम करणाऱ्या काही कामगारांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिलं, 'फार्महाऊसवर काम करताना आम्ही सर्व अशाप्रकारे एन्जॉय करत असतो. नेहमीच विनम्र राहा आणि स्वतःमधली माणूसकी जागृत ठेवा. कोणीच लहान अथवा मोठा नसतो. धर्माची बंधन तोडून एकमेकांना भेटा हे जग खूप सुंदर होईल. सर्वांना प्रेम.' करोना व्हायरसचा प्रसार वाढल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या काळात धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवर राहून शेती करत होते. यावेळी त्यांनी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. जे चर्चेचा विषय ठरले होते. कधी फार्महहाऊसवर पिकवलेल्या भाज्या तर कधी गायीनं पाडसाला जन्म दिला या सर्व गोष्टी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केल्या होत्या. ८५ वर्षीय धर्मेंद्र सध्या त्यांचा जास्तीत जास्त वेळ फार्महाऊसवरच घालवताना दिसतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uB1Yuc