Full Width(True/False)

whatsapp कॉल फ्री व सोप्या पद्धतीने रेकॉर्ड करायचा? 'या' आहेत जबरदस्त टिप्स आणि ट्रिक्स

नवी दिल्लीः सोपे नाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करणे, परंतु काही युक्त्या वापरल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल सहज रेकॉर्ड करू शकता. तपशीलवार माहिती जाणून घ्या.. वाचाः व्हॉईस कॉल रेकॉर्ड करणे आपल्यासाठी अगदी सोपे आहे. कारण आपल्या मोबाइलच्या स्क्रीनवर आपल्याला कॉल रेकॉर्डचा पर्याय दिसतो. परंतु व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय दिसत नाही आणि लोक अस्वस्थ होतात. काहीतरी महत्त्वाचे बोलणे, चर्चा व्हाट्सएप मार्फत होत असेल तर ती रेकॉर्ड करायची कशी? आहे. हे अँड्रॉइड किंवा आयफोन वापरकर्त्यांसाठी सोपे वाटत नाही पण आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या युक्त्या सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल सहज व विनामूल्य रेकॉर्ड करू शकता. वाचाः मी एक गोष्ट सांगते की जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करत असाल तर आधी त्या व्यक्तीकडून तुम्हाला परवानगी घेणे महत्वाचे आहे. तुम्ही संबंधित व्यक्तीची परवानगी घ्या. तसेच ते भारतात वैध आहे की नाही हे देखील माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, एखाद्याच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे काही वेळा चांगले नसते. वाचाः आता सोप्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करणे सोपे नाही. अशात जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल ते MacBook, iPhone बरोबर Android फोनची आवश्यकता आहे. त्या अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चे अकाउंट असायला हवे जे व्हॉईस कॉलला साथ देईल. आता जाणून घेऊया की व्हॉट्सअ‍ॅप कॉल कसा रेकॉर्ड करायचा ते. सगळ्यात आधी आईफोन ला मैकबुक ला लाईटिंग केबलच्या मदतीने जोडा. त्यानंतर आईफोन वर आलेला Trust this computer पर्याय निवडा. मग मैकबुक वरती QuickTime चालू करा आणि त्यात दिसणाऱ्या पर्यायांपैकी new audio रेकॉर्डिंग पर्याय निवडा. त्यानंतर QuickTime वरतीदाखवलेल्या रेकॉर्ड बटनावर क्लिक करा. अलिकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीबाबत बरेच वादंग निर्माण झाले आहेत. वाचाः प्रायव्हसी नाही यानंतर आपल्या आयफोनवरून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आपल्या अँड्रॉइड फोनवर कॉल करा आणि युजर आयकॉन वर जा. ज्याच्याशी आपण बोलू इच्छित आहात त्याची निवड करा. त्याच्याशी संभाषण सुरू होताच रेकॉर्डिंग देखील चालू करा. आपण कॉल डिस्कनेक्ट करताच, त्यानंतर क्विकटाइम मध्ये ते रेकॉर्डिंग बंद करा आणि ते मॅकबुकमध्ये जतन करा. तुम्हाला जर एखाद्याचा कॉल हा अशा प्रकारे रेकॉर्ड करायचा असेल तर संबंधित व्यक्तीस त्याबद्दल माहिती होईल. तुमची इच्छा असल्यास आपण क्यूब कॉल रेकॉर्डर इंस्टॉल करून व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड देखील करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oOFfGO