Full Width(True/False)

Xiaomi चे मेक इन इंडिया, भारतात बनवणार ९९ टक्के मोबाइल्स, आणि १०० टक्के स्मार्ट टीव्ही

नवी दिल्लीः आत्मनिर्भर भारतासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. विदेशी टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा आता भारतात प्रोडक्ट हळूहळू बनवण्यासाठी फोकस करीत आहेत. मेड इन इंडिया प्रोडक्ट खरेदीसाठी आता जोर दिला जात आहे. त्यामुळे चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी मेक इन इंडियावर फोकस करीत आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टवॉच सह अन्य प्रोडक्ट्स आता जास्तीत जास्त भारतात बनवले जात आहेत. वाचाः मेड इन इंडिया चायनीज स्मार्टफोन्स आणि टीव्ही भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन्स विकणारी कंपनी शाओमी ने आता घोषणा केली आहे की, आगामी काळात भारतात विकल्या जाणाऱ्या मी आणि रेडमीचे ९९ टक्के स्मार्टफोन्स सोबत १०० टक्के स्मार्ट टीव्हीचे प्रोडक्ट भारतात तयार केले जाणार आहेत. शाओमीचे इंडिया हेड आणि ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी याला सार्वजनिक केले आहे. शाओमी लवकरच भारतात मोबाइल मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट आणि एक टेलिव्हिजन प्लांट उघडणार आहे. ज्यात शाओमीचे प्रोडक्टस तयार केले जाणार आहेत. वाचाः भारताला एक्सपोर्ट बनवायचे आहे शाओमीच्या इंडिया प्रमुखाने एका मुलाखतीत हे सांगितले की, भारतात बनवण्यात येणाऱ्या रेडमी आणि मीचे प्रोडक्ट्स बांगलादेश आणि नेपाळला निर्यात केले जातील. भारताला एक्सपोर्ट हब बनवण्याची तयारी केली जात आहे. शाओमीला भारतात खूप मागणी आहे. त्यावर आता फोकस केले जाणार आहे. मेक इन इंडिया मजबुत करण्यासाठी शाओमी प्रयत्न करणार आहे. भारतात विकले जाणारे १०० टक्के प्रोडक्शन भारतात तयार केले जातील. तसेच आम्ही एक्सपोर्ट्स वाढवण्यासाठी सुद्धा फोकस करणार आहोत. सध्या भारतात शाओमीचा एक मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट तयार झाला आहे. यात शाओमीचे डिव्हाइसचे प्रोडक्शन सुरू करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b16PwQ