मुंबई: बिग बॉसचा १४ वा सीझन राखी सावंतनं गाजवला. वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या राखीनं इचर स्पर्धकांना टक्कर देत फिनालेपर्यंत मजल मारली होती. अखेर राखी १४ लाखांची रक्कम घेऊन फिनालेच्या स्पर्धेतून बाहेर पडली. जेव्हा तिला असं करण्यामागचं कारण विचारण्यात आलं त्यावर तिनं हे पैसे मला माझ्या आईच्या उपचारांसाठी वापरता येतील असं म्हटलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एकीकडे इतर स्पर्धक पार्टी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मात्र तिच्या आईची काळजी घेण्यात बिझी आहे. अशात आता आणि त्याचा भाऊ राखीच्या मदतीला धावून आले आहेत. राखी सावंत हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सलमान खान आणि सोहेल खान राखीला धीर देताना दिसत आहेत. सोहेल खाननं या व्हिडीओमध्ये राखी खूपच खंबीर आणि धीराची असल्याचं म्हटलं आहे. राखीनं शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कमेंटमध्ये चाहत्यांनीही तिच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्यांचं म्हटलं आहे. याआधीही राखीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं सलमान खान देवासमान असल्याचं सांगत त्याचे आभार मानले होते. सोहेल खाननं या व्हिडीओमध्ये म्हटलं, 'डिअर राखी, तुला आणि तुझ्या आईला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला सरळ फोन कर. मी तुझ्या आईला कधी भेटलेलो नाही पण मी तुला ओळखतो. तू खूप खंबीर आहेस. जर तू एवढी धीट आहेस तर मग त्या तर तुझी आई आहेत मग त्या किती खंबीर असतील याची कल्पना मी करू शकतो. त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करतो. सर्व काही ठीक होईल. त्या ठीक झाल्यानंतर मी स्वतः त्यांना कॉल करून त्यांच्याशी बोलेन' राखीची आई सध्या कॅन्सरशी लढा देत असून मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राखीनं तिच्या आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r2TuK9