Full Width(True/False)

6000mAh बॅटरीचा Realme C25 भारतात होणार लाँच, कंपनीकडून कन्फर्म

नवी दिल्लीः स्मार्टफोन भारतात लाँच होणार हे आता कन्फर्म झाले आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर रियलमी सी सीरीजच्या या फोनची भारतात एन्ट्री होणार असल्याची सांगत एन्ट्री टीज केले आहे. माधव सेठ यांच्या ट्विटर पोस्टच्या माहीतीनुसार, 6000mAh बॅटरी असलेला हा फोन एप्रिल महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, या फोनला ३ एप्रिलला किंवा एप्रिलच्य तिसऱ्या आठवड्यात लाँच केले जाऊ शकते. कंपनीने या फोनला मागील महिन्यात इंडोनेशियात लाँच केले होते. वाचाः रियलमी C25 चे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी IPS LCD दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो जी ७० चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम लेन्स दिला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी सी २५ स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Realme UI 2.0 वर काम करतो. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली असून १८ वॉट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ ५.० जीपीएस, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. भारतात कंपनी या फोनला १० हजार रुपयांच्या जवळपास लाँच करू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QKWGwF