Full Width(True/False)

‘तुझ्यात जीव रंगला’ संपल्यानंतर काय करतेयस?अक्षया म्हणते...

अंजली पाठक या भूमिकेनं स्वतःचा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या हिचे ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेत आहेत. आधी मालिकेमुळे व्यग्र असल्यामुळे आता स्वतःला वेळ देतेय, सोशल मीडिया वापरून पाहतेय आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी तयारी करतेय, असं सांगत अक्षयानं विविध विषयांवर तिची मतं मांडली. पक्की खवय्यी असणाऱ्या अक्षयाला ट्रॅव्हल आणि फूड शो करायची इच्छा आहे. 'निकोप स्पर्धा असावी; मात्र कलाकार एकमेकांना सगळ्याच गोष्टीत स्पर्धक मानतात, व्यवसायिक स्पर्धा समजू शकते; पण त्यापलीकडे माणूस म्हणून एकमेकांना समजून घ्यायला हवं. एकमेकांना फॉलो किंवा अनफॉलो करणं हे सोशल मीडियामुळे निर्माण झालेलं घाणेरडं वर्तुळ आहे, हे मान्य करायला हवं,’ असं ती म्हणते. मालिका संपल्यावर...मालिका संपल्यावर काय नवं; असं विचारताच अक्षया म्हणाली, ‘सध्या तरी मी आराम करतेय. मालिका संपून काही काळ झाला. गेली चार वर्षं मालिका सुरू होती. मी आता नियमित व्यायाम करतेय. नवे छंद जोपासतेय. सोशल मीडिया वापरून पाहतेय. काही फोटोशूट केले. नव्या भूमिकांसाठी सज्ज होताना मनानं आणि शरीरानंही आपण कणखर होणं गरजेचं आहे. ती तयारी होत आहे.’ वैयक्तिक आयुष्य जपू द्यासोशल मीडिया आणि कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य याबाबत अक्षया म्हणाली, ‘चाहत्यांशिवाय, त्यांच्या प्रतिसादाशिवाय कलाकार कुणीच नसतो, हे सत्य आहे. रसिकांच्या प्रतिसादाशिवाय आपलं काम नेमकं कुठं आहे, हे कळतही नाही. चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे कलाकार उभा राहतो. तरीही सोशल मीडिया आणि वैयक्तिक आयुष्य याची सरमिसळ अयोग्य आहे. कलाकाराला त्याचं वैयक्तिक आयुष्य जपू द्यावं. कुणीही लगेच जजमेंटल होऊ नये.’ ताकदीच्या भूमिका हव्यातमालिकेतली भूमिका गाजली, की तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारणा होते. अक्षयला मात्र ताकदीच्या भूमिका साकारायच्या आहेत. पुन्हा ग्रामीण बाजाची भूमिका साकारायची तयारी असल्याचं सांगत अक्षया म्हणाली, ‘दर वेळी मला मुख्य नायिकेचीच भूमिका हवी असा आग्रह नाही. मला कॅरेक्टर रोल करायलाही आवडेल. ग्लॅमरस भूमिकांसाठी मी अजून तयार नाही; पण मला सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. ऐतिहासिक भूमिकेसाठी विचारणा झाली तर निश्चितच साकारायला आवडेल.’ मानधन आणि करिअरफॅशन, मानधन आणि करिअर स्पॅन याबद्दल अक्षया म्हणते, ‘ज्यात मी कम्फर्टेबल असते तीच माझ्यासाठी फॅशन आहे. अक्षया म्हणून माझी आवड पारंपरिक वा फार तर इंडो-वेस्टर्नकडे झुकणारी आहे. उगाच प्रदर्शन करणारे पेहराव मला रूचत नाहीत. माझ्यासाठी अभिनय ही मानधनापलीकडची गोष्ट आहे. तुलना होत राहील मात्र मराठीतल्या सगळ्या ज्येष्ठ अभिनेत्री आजही उत्तम काम करत आहेत. तुमची इच्छा चिरतरुण असेल, तर तुमचा करिअर स्पॅन तुमच्याच हाती आहे.’ रॅपिड फायर पुरस्कार सोहळे : नो कमेंट्स छंद : भटकंती विअर्ड डेट : माणसांत आहोत आणि डेटला आलोय इंडस्ट्रीत टिकण्यासाठी : पेशन्स, ऊर्जा हवी, काम मिळवण्याची घाई नको अभिनय सोडून आवड : गाणी ऐकणं, फिल्म आणि सीरीज पाहणं, घरात रमणं


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Pj3W2z