Full Width(True/False)

Android आणि iPhone मध्ये WhatsApp कॉलिंग अशी करा रेकॉर्ड, जाणून घ्या सोपी ट्रिक

नवी दिल्लीः अनेकदा आपण फोनवर बोलत असताना आवश्यक कॉलिंग रेकॉर्ड करण्याची इच्छा असते. नॉर्मल कॉल असेल तर सहज रेकॉर्ड करता येऊ शकते. कारण, आपल्या मोबाइलमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्ड अॅप असते. परंतु, WhatsApp कॉलला रिकॉर्ड करणे जरा अवघड आहे. त्यामुळे यासाठी थर्ड पार्टी अॅपसची गरज पडते. वाचाः iPhone मध्ये असे रेकॉर्ड करा WhatsApp कॉल >> आयफोन (iPhone) मध्ये WhatsApp कॉल रेकॉर्ड करणे अवघड आहे. यात व्हिडिओ कॉल असेल तर सहज रेकॉर्ड करू शकता येते. परंतु, ऑडियो कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला माइक किंवा एक्स्ट्रा फोनची गरज पडते. ज्यात व्हॉट्सअप नाही. >> कॉल रेकॉर्ड करण्यासाठी आयफोनला मॅक सोबत लाइटनिंग केबल सोबत कनेक्ट करा. >> जर तुम्ही पहिल्यांदा दोन्ही डिव्हाइसला कनेक्ट करीत असाल तर ट्रस्ट दिस कम्प्यूटर (Trust This Computer) च्या नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागेल. >> यानंतर मॅक वर क्विक टाइम (QuickTime)ला ओपन करा. यानंतर फाइल मध्ये जाऊन न्यू ऑडियो रिकॉर्डिंग वर क्लिक करा. >> ज्यावेळी तुम्ही क्विक टाइम (QuickTime) मध्ये रेकॉर्ड़ बटनवर जाल. त्या बटन समोर एक अॅरो खालील बाजुने पॉइंट करताना दिसेल. या ठिकाणी आयफोनच्या ऑप्शनची निवड करा. >> क्विक टाइम (QuickTime) मध्ये रिकॉर्ड बटनला टॅप करा. आता आयफोनवरून एक्स्ट्रा फोनवर व्हॉट्सअॅप कॉल करा. >> कॉल कनेक्ट झाल्यानंतर अॅप युजरच्या आयकॉनची निवड करा. ज्याला तुम्हाला कॉल करायचा आहे. फोन केल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट करा. QuickTime ची रेकॉर्डिंग बंद करा. फाइलला मॅकवर सेव्ह करा. >> विशेष म्हणजे यात कॉलला विना माहिती शिवाय, कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. Android फोन मध्ये WhatsApp कॉल रिकॉर्ड करण्याची पद्धत >> अँड्रॉयड फोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी सॉफ्टवेयरची गरज पडेल. याला तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. >> या सॉफ्टवेयरचे नाव Cube Call Recorder आहे. याला तुम्ही VoIP कॉलला रेकॉर्ड करू शकता. हे सर्व डिव्हाइसवर काम करू शकत नाही. >> Cube Call Recorder अॅपला इंस्टॉल केल्यानंतर याला ओपन करा. यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा. ज्या व्यक्तीला कॉल करून त्याची रेकॉर्डिंग करायची आहे. त्याला कॉल करा. >> जर बोलत असताना Cube Call विजेट शो होत असेल आणि लाइट येत असेल तर हे व्यवस्थित काम करीत आहे. >> जर एरर मेसेज येत असेल तर Cube Call Recorder च्या सेटिंग मध्ये जाऊन Force VoIP call as voice call वर क्लिक करा. जर या दरम्यान Cube Call विजेट शो होत असेल तर हे काम करीत आहे. जर एरर येत असेल तर फोन काम करीत नाही. >> व्हॉट्सअॅप कॉलला रेकॉर्ड केल्यानंतर दुसऱ्या फोनची मदत घेता येवू शकते. यात व्हॉट्सअॅप कॉलला स्पीकरवर ठेवू शकता. दुसऱ्या फोनची व्हाइस रेकॉर्डिंग ऑन करा. परंतु, हे लक्षात ठेवा की, तुमच्या आजुबाजुला कोणताही आवाज येता कामा नये. तरच रेकॉर्डिंग व्यवस्थित येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qCY4he