Full Width(True/False)

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदलता येणार रंग, येतेय नवीन फीचर

नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेले सर्वात जास्त वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप नवीन फीचरवर काम करीत असल्याची एक बातमी समोर आली आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांना अ‍ॅपमधील रंग बदलता येणार आहेत. जगभरात व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी युजर्स असून या नवीन फीचरमुळे या सर्व युजर्सची चॅटिंग मजा आणखी जबरदस्त होणार आहे. वाचाः या आगामी फीचरची माहिती WaBetaInfo या वेबसाईटने ट्विटरवर ट्विट करून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप एका अशा फिचर वर काम करीत आहे जे वापरकर्त्यांना अ‍ॅपमधील काही रंग बदलण्याची मुभा देईल. या फिचरवर सध्या काम चालू असून या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त माहिती सध्या तरी समोर आली नाही. वाचाः या ट्विटमध्ये आगामी फीचरचे काही स्क्रीनशॉट पण जोडण्यात आले आहेत. या इमेजेसमधून असे दिसते की, या फीचरचा वापर करून वापरकर्ते चॅटबॉक्स मधील काही रंग बदलू शकतील. वापरकर्त्यांना स्क्रीनवरील मजकूरासाठी गडद हिरव्या रंगाची पण निवड करता येईल. वाचाः व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसणार इंस्टाग्राम रिल्स काही दिवसांपूर्वी आलेल्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, फेसबुक Instagram आणि यांचे इंटिग्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत युजर्संना व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इंस्टाग्राम रिल्स दिसत आहेत. सध्या ही प्रक्रिया टेस्टिंग मध्ये आहे. यासंबंधी सध्या तरी काही ठोस सांगता येत नाही. आगामी काही दिवसांनंतर या फीचर्सची माहिती मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wd8sjK