Full Width(True/False)

ट्रिपल रिअर कॅमेरासह Oppo A54 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः Oppo ने आपल्या ए-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन इंडोनेशियात लाँच केला आहे. नवीन गेल्यावर्षी लाँच झालेल्या चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. Oppo A54 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासोबत 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि यात एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वाचाः कंपनीने Oppo A54 ची किंमत 2,695,000 इंडोनेशियन रुपये ठेवली आहे, ही किंमत भारतीय चलनात १३,६०० रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा फोन विकत घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांसमोर कंपनीने क्रिस्टल ब्लॅक आणि स्टारी ब्लू अश्या दोन रंगांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. हा डिवाइस लाझडा इंडोनेशिया या इंडोनेशियन शॉपिंग वेबसाईटवर लिस्ट झाला आहे, पण कंपनीने या फोनच्या उपलब्धतेची कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिली नाही. वाचाः Oppo A54 चे स्पेसिफिकेशन्स Oppo A54 मध्ये ऑक्ट-कोर मीडियाटेक हीलिओ पी35 प्रोसेसर देण्यात आला असून यासोबत ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 720x1600 पिक्सेल इतके आहे. हा डिस्प्ले 60 हर्टज रिफ्रेश रेटसह येतो आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 89.2 टक्के आहे. वाचाः Oppo A54 कंपनीच्या कलर ओएस 7.2 वर चालतो जो अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट असून फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन IPX4 रेटिंगसह येतो, हे हा फोन वॉटर रेजिस्टंट असल्याचे प्रमाणपत्र आहे. Oppo A54 च्या मागे असलेल्या ट्रिपल रिअर कॅमेऱ्यात १३ MP चा मुख्य सेंसर, २ MP चा मायक्रो सेंसर आणि २ MP चा तिसरा सेंसर बोके शॉट्ससाठी देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी फोटो घेण्यासाठी १६ MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जींग सपोर्टसह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिमाइज्ड ओव्हरनाईट चार्जिंग नावाचे विशेष फिचर देण्यात आले आहे. या फिचरबाबत कंपनीने दावा केला आहे की यामुळे तुमच्या झोपेच्या वेळेनुसार चार्जिंगच्या वेगात बदल केला जातो जेणेकरून फोन अतिचार्ज होत नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dkPUph