मुंबई ः बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री सोनी टिव्हीवरील १२ च्या सेटवर हजेरी लावली आहे. यावेळी याने त्याच्या इन्स्टाग्रामवर रेखासोबतचे काही धम्माल फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये रेखा खूप मज्जा करत असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक आणि जज नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांच्यासह रेखा यांनी खूप मजा केली आहे. लवकरच हा भाग प्रसारित केला जाईल विशालबरोबर केली मौजमजा रेखा यांच्यासोबतचा इंडियन आयडॉलच्या सेटवरचा फोटो शेअर करत विशालने लिहिले, 'आजचा दिवस खूपच सुंदर होता.. या पहिल्या फोटोमध्ये रेखाजींनी चक्क माझ्या डोक्यावरच तबला वाजवून मला आश्चर्यचकीत केले.. दुस-या फोटोत आता संधीच मिळाली आहे तर मी त्यांच्याबरोबर डान्स करण्याची संधी कशी सोडणार, सरतेशेवटी त्या उत्तम नर्तिका आहे. त्यांनी संपूर्ण दिवस मला विशू जी म्हणून हाक मारली... उफ्... त्यांचा तो गूढ आवाज..#इंडियनआयडॉल २०२१. ' काही दिवसांपूर्वी सोनी चॅनलवरून एक प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे, त्यात रेखा या कार्यक्रमात आलेल्या दिसल्या. येत्या आठवड्याअखेरीस हा भाग प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमातील सर्व स्पर्धकांनी रेखा यांची लोकप्रिय गाणी सादर केली आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात नुकतीच नितू कपूर या देखील आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच ऋषी कपूर यांनी टेलीग्राम करून त्यांना लग्नाची मागणी घातल्याचेही नितू यांनी सांगितले. याच वेळी नीतू कपूर यांनी नेहा कक्कड ला शगुन दिला होता. हे सर्व फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u7Wk1v