मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या खलनायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दर्शवली. नवाजुद्दीनला बॉलिवूडचं नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतूनही चित्रपटांच्या ऑफर येत असतात. एकीकडे करिअरमध्ये उच्चांक गाठत असताना त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच वादात राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या रंगपंचमीच्या दिवशी नवाजुद्दीनची पत्नी आलिया तिच्या दिरासोबत धुळवड खेळताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आलियाने नवाजुद्दीनच्या भावावर अनेक गंभीर आरोप केले होते. आलियाने नवाजुद्दीनच्या भाऊ शम्स सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय आलियाने शम्स आणि नवाजुद्दीन या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. परंतु, आता आलियाने नात्याला एक संधी देण्याचा विचार केला. नवाजुद्दीनने दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. करोना रुग्ण वाढू लागल्याने नवाजुद्दीन आलिया आणि त्याच्या मुलांना लखनऊवरून मुंबईला घेऊन आला होता. त्यादरम्यान त्याने त्यांची खूप काळजी घेतली. त्यामुळे आलियानेही त्यांचं नातं न तोडण्याचा निर्णय घेतला. नवाजुद्दीनच्या भावाने धुळवड साजरी करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनचा भाऊ आलिया आणि तिच्या मुलांना नवाजच्या कसारा येथील फार्महाउसवर घेऊन गेला होता. याबद्दल सांगताना शम्स म्हणाला की, 'जे झालं ते झालं. आपण आपल्या अनुभवातून शिकतो. आता सगळं काही ठीक आहे. मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो. आम्ही सगळ्यांनी खूप मजा करत धुळवड साजरी केली आहे. नवाज आम्हाला ५ एप्रिल रोजी येऊन भेटणार आहे.' त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये आलियालादेखील टॅग केलं आहे. या व्हिडिओमध्ये ते एका आनंदी कुटुंबाप्रमाणे दिसत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3di7R7Q