Full Width(True/False)

...तरीही करोना झालाच, गायक सलील कुलकर्णी पॉझिटिव्ह

मुंबई- देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्याचा प्रभाव बॉलिवूडवर झालेला दिसून येतोय. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोना पॉझिटिव्ह आले आहेत. शक्य तेवढी काळजी घेऊनही करोना झाल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात करोनाची झळ आता मराठी चित्रपटसृष्टीवरही दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यात आता प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार असलेले डॉ. यांनाही करोनाची लागण झाली आहे. सलील यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली. आपल्या गाण्यांमधून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सलील यांनी ट्विटरवरून ते करोना पॉझिटीव्ह आल्याचं चाहत्यांना सांगितलं. आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ट्वीट करत त्यांनी लिहिलं, 'सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच क्वारन्टाइन करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषध सुरू केली आहेत. गेल्या एका आठवड्यात मला भेटलेल्या व्यक्तींना याची कल्पना असावी म्हणून हे ट्वीट केलं.' यासोबत त्यांना भेटलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय ' नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनीही ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्वतःला घरात क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सावध करत काळजी घेण्याची विनंती केली आहे. प्राजक्त यांनी जितेंद्र जोशी यांच्या 'गोदावरी' या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. बॉलिवूडनंतर मराठी चित्रपटसृष्टीतही करोनाचा प्रभाव वाढू लागल्याचं चित्र आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31wc0zr