मुंबई- 'गोल्ड' चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. काही दिवसांपासून मौनी सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती लवकरच तिच्या बॉयफ्रेण्डसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्यादेखील कानावर पडत होत्या. परंतु, मौनीने याबद्दल कोणताही खुलासा केलं नव्हता. आता मात्र मौनीने तिच्या लग्नाच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तिने तिच्या लग्नाच्या बातम्यांचं समर्थन केलं नसलं तरी त्यांना नकारही दिलेला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौनीला तिच्या लग्नाबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा मौनीने उत्तर देताना म्हटलं, 'मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला इतरांपासून दूरचं ठेवते. तुम्ही कितीही वेळा विचारलं तरी माझं उत्तर तेच असेल.' त्यानंतर लग्न कधी करणार या प्रश्नावर बोलताना मौनी म्हणाली, 'मी कधी लग्न करणार ते तर माहित नाही पण जेव्हा करेन तेव्हा सगळ्या दुनियेला माहीत पडेल. ' काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की मौनी लग्नासंदर्भात बोलण्यासाठी तिच्या बॉयफ्रेण्डच्या आई- वडिलांना भेटली होती. ते दोघे लवकरात लवकर लग्न करू इच्छित आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मौनीच्या आईने तिचा बॉयफ्रेण्ड सुरज नांबियारच्या आई वडिलांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट मंदिरा बेदीच्या घरी झाली होती. या भेटीदरम्यान, मौनीचे दोन्ही भाऊ उपस्थित होते. दोन्ही कुटुंबांमध्ये बराच वेळ बोलणं सुरु होतं आणि त्यावरून असा अंदाज लावला जात होता की, लवकरच त्यांच्या लग्नाची तयारीदेखील सुरू केली जाईल. सुरज आणि मौनी खूप चांगले मित्र असून सुरज दुबईमध्ये बँकर आहे, ते दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ती आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cEEbml