मुंबई- झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका '' मध्ये राणाची भूमिका साकारणारा अभिनेता सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु करून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली. त्याने कोल्हापूरमध्येच नवीन व्यवसाय सुरु केला आहे. '' असं त्याच्या ब्रॅण्डचं नाव असून तो या फूड ब्रॅण्डचा मालक आहे. त्याच्या या निर्णयाचं त्याच्या चाहत्यांकडून स्वागत होताना दिसतंय. अनेक प्रेक्षक त्याचं याबद्दल कौतुक करत आहेत. मराठी कलाकार व्यवसायाकडे वळतोय हे पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'नमस्कार, आजपर्यंत कोल्हापूरकरांनी आणि समस्त मराठी प्रेक्षकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. अगदी लहान मुलांपासून ते आजी- आजोबांपर्यत सगळ्यांनीच माझे खूप लाड केले. म्हणूनच या सगळ्यांसाठी मी पौष्टिक असे पदार्थ आणलेत. जे माझ्या स्वतःच्या ब्रँडचे आहेत. यात कोल्हापूरची बदाम थंडाई आणि इतरही अनेक पदार्थ आहेत. तुम्ही या आणि या पदार्थांचा आस्वाद घ्या. तुमचे फोटो किंवा व्हिडीओ कोल्हापूर बदाम थंडाई या फेसबुक पेजवर टॅग करा. त्यातून काही भाग्यवान विजेत्यांना खास भेटवस्तू देखील मिळणार आहे.' असं म्हणत त्याने त्याच्या दुकानाचा पत्ता देखील सांगितला आहे. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलं, आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझ्यासोबत राहील हा मला विश्वास आहे...कोल्हापूर बदाम थंडाई...मग काय येणार नव्ह ? यायला लागतंय...चालतंय की.' यापूर्वीही अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित यांसारख्या अनेक मराठी कलाकारांची पावलं व्यवसायाकडे वळली आहेत. हार्दिकने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत साकारलेल्या राणाच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. रांगडा पण हळुवार मनाचा प्रेक्षकांना भावाला होता. पैलवान असूनही स्त्रियांपासून दूर पळणारा राणा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता होता. त्यासोबतचं पाठकबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर हिनेदेखील प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3swatEU