Full Width(True/False)

मुस्लिम असल्यानं वहिदा रेहमान यांना भरतनाट्यम शिकवण्यास दिला होता नकार

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाची साक्षीदार अभिनेत्री वहिदा रहमान सध्या चित्रपटांपासून दूर असलेल्या वहीदा यांच्या डान्सचे चाहते आजही आहे. नुकतीच वहिदा रेहमान यांनी आशा पारेख आणि हेलन यांच्यासोबत 'डान्स दिवाने'च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्याच्या करिअरच्या काळातले अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्यांना शिकवण्यासाठी कशाप्रकारे गुरूंनी नकार दिला होता आणि त्यानंतर काय घडलं याचा किस्सा सांगितला. वहिदा म्हणाल्या, 'जेव्हा मी चेन्नईमध्ये होते. त्यावेळी मला भरतनाट्यम शिकायचं होतं. तिथल्या प्रसिद्ध अशा गुरुंकडे नृत्य शिकता यावं यासाठी मी माझ्या मैत्रिणीला सांगून त्यांना मला भरतनाट्यम शिकवण्याची विनंती केली. पण त्यांनी असं करण्यास नकार दिला होता. का तर तर मी मुस्लिम आहे. मी खूप हट्ट केल्यानंतर ते तयार सुद्धा झाले पण त्यांनी माझी कुंडली मागितली. पण ती माझ्याकडे नव्हती कारण माझ्या धर्मात असं काही बनवलं जात नाही. त्यानंतर गुरुजींनी माझी जन्मतारीख मागवली आणि स्वतःच कुंडली तयार करून घेतली. जी पाहिल्यावर त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं कारण त्या कुंडलीनुसार मी त्यांची सर्वात शेवटची आणि उत्तम शिष्या होते.' त्यानंतर त्या गुरुंनी वहिदा यांना भरतनाट्यम शिकवण्यास सुरुवात केली. वहिदा भरतनाट्यम शिकल्या आणि आजही त्यांना या नृत्यकलेची उत्तम जाण आहे. त्यांच्या करिअरच्या काळात त्या एक उत्तम डान्सर म्हणून ओळखल्या जात होत्या. आजही त्यांचं नृत्य पाहिल्यावर कोणीच त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3srpJU2