मुंबई: 'ब्लॅक पँथर' फेम सुपरस्टार यांना मरणोत्तर ‘’पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. २०२०मध्ये आलेला ‘'मा रेनीज ब्लॅक बॉटम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गौरवण्यात आलं आहे. वर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या या सोहळ्यात बोसमन यांची पत्नी यांनी हा पुरस्कार स्विकारला. या दरम्यान त्या भावुक झाल्या होत्या. बोसमन यांच्याबद्दल बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले. 'ते असते तर त्यांनी देवाचे आई-वडिलांचे मानले असते, तसंच मार्गदर्श आणि त्यागासाठी पुर्वजांप्रतीही त्यांनी भावना व्यक्त केल्या असत्या', सिमोन लेडवर्ड म्हणाल्या. बोमसन यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या हिरोला आम्ही कधीही विसणार नाही असं चाहते म्हणतायत. २०१६मध्ये चॅडवीक बोसमन यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. २०२०मध्ये त्यांचा हा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला. कर्करोगाच्या उपचारादरम्यान त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तसंच केमोथेरपीदेखील सुरु होती. असं असलं तरी 'शो मस्ट गो ऑन' म्हणत त्यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं होतं, कामातून ब्रेक घेतला नव्हता. कर्करोगाचे उपचार सुरू असताना त्यांना 'मार्शल', 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r5KxQo