मुंबई: अभिनेता रितेश देखमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुटुंबासोबतचे क्षण असो किंवा मग मित्रांसोबतची पार्टी. रितेश नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. मागच्या काही दिवसांपासून तो मित्रांसोबत पार्टी किंवा व्हेकेशन एन्जॉय करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. पण आता त्यानं एक असा व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल झाला आहे. रितेश देशमुखनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पांडाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याचा चित्रपट 'हाउसफुल ३'चं गाणं वाजताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक पांडा एक पाय वर करून डान्स करताना दिसत आहे. याशिवाय या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'आजा करें गोविन्दा का डांस, टांग उठा के' हे गाणं वाजत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशनं लिहिलं, 'मास्क वापरायला विसरू नका, करोना अजून गेलेला नाही- बुलबुल पांडा' याआधी रितेशनं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्याची पत्नी जेनेलिया आणि काही फ्रेंड्स स्विमिंगपूलच्या जवळ उभे राहून 'टोटल धमाल'च्या 'पैसा ये पैसा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. रितेश देशमुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, तो मागच्या वर्षी 'बागी ३'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. यात त्यानं टायगर श्रॉफच्या भावाची भूमिका साकारली होती. तर आगामी काळात तो अक्षय कुमार सोबत 'बच्चन पांडे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uI6UxC