मुंबई ः हिने सिंड्रेलाच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हा ड्रेस तिने फिल्म फेअर अवॉर्ड कार्यक्रमात घातलाहोता. त्यावेळी काढलेले फोटो तिने आता शेअर केले आहेत. साराच्या सिंड्रेला लुकमधील या फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. साराचे हे फोटो पाहून तिच्या शाळेतील एका मित्राने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर सारानेही त्याला हजरजबाबीपणे उत्तर दिले आहे. साराने तिच्या सिंड्रेला लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले आहे,'सिंड्रेला स्टोरी'. तसेच या फोटोसाठी तिला तयार करणआ-या मेकअप आणि हेअरस्टाईल करणा-या टीमचे आभार मानले आहे. हे फोटो पाहून नेटक-यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर सुरू केला. साराचे हे फोटो पाहून कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील तिच्या वर्गमित्राने ओराहन अवतरमणी (Orhan Awatramani ) याने तिला विचारले 'अरे तू पुन्हा कधी होणार आहेस?' यावर साराने उत्तर देताना सिंड्रेलाच्या गोष्टीमधील संदर्भ दिला. ती म्हणते,'मध्यरात्रीनंतर!' तर साराच्या एका चाहत्याने फोटो पाहून तिला विचारले की, 'तू फोटोमध्ये आश्चर्यचकीत का दिसत आहे? ' एकूणच साराच्या या लुकवर चाहत्यांनी तिचे कौतुक करणारे तसेच तिला ट्रोल करणा-या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाळा-कॉलेजमध्ये असताना सारा अतिशय लठ्ठ होती. तिचे वजन जवळपास ९५ किलो इतके होते. सारा अनेकदा तिचे जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि त्यासंबंधीत असलेले किस्से, घटना आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31z5sQF