Full Width(True/False)

मराठी सिनेसृष्टीचं नुकसान भरुन निघणार का? ८३ सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज

गेल्या वर्षभरात झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं? हा प्रश्न सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना पडला आहे. तसाच तो मराठी मनोरंजनसृष्टीला देखील पडला आहे. यापूर्वी सिनेसृष्टीचं एवढं प्रचंड नुकसान कधीच झालं नव्हतं किंवा तसा कोणी विचारही केला नव्हता. गेले ११ महिने मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाचं चक्र मंद गतीनं फिरतंय. एकीकडे मराठी सिनेविश्वात एकामागोमाग एक सिनेमांचं चित्रीकरण सुरु आहे तर दुसरीकडे थिएटर व्यवसाय मंदावला आहे. पण, आता हळूहळू परिस्थितीत बदल होत आहेत. व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे प्रदर्शनासाठी चित्रपट सज्ज आहेत. आकडेवारीत सांगायचं झाल्यास २०२०मध्ये एकूण १३१ मराठी सिनेमे सेन्सॉर प्रमाणित झाले आहेत. त्यात लॉकडाउन पश्चात म्हणजेच जुलै २०२० नंतर सेन्सॉर प्रमाणित झालेल्या सिनेमांची संख्या ८३ आहे. लॉकडाउनमध्ये १८ मार्च, २०२० पासून ते जूनच्या अखेरीपर्यंत मराठी सिनेमांच्या सेन्सॉर प्रक्रियेचं काम बंद होतं. पण लॉकडाउन पश्चात सेन्सॉरसाठी सादर झालेल्या मराठी सिनेमांची संख्या ही मराठी सिनेविश्वासाठी आशादायी आहे. प्रेक्षकांना पर्वणी ९ जुलै ते ३१ डिसेंबर, २०२० या काळात 'केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड'कडून ७३ मराठी चित्रपट प्रमाणित झाले आहेत. तसंच जानेवारी २०२१मध्ये १० नवे सिनेमे प्रमाणित झाले आहेत. यातील एखाद-दुसरा सिनेमा प्रदर्शित झाला. उर्वरित ८० चित्रपट प्रदर्शनापासून वंचित आहेत. २०१९ची आकडेवारी पाहिल्यास २२७ चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र मंजूर झालं होतं. यातील ३० ते ४० टक्के सिनेमे अद्याप प्रदर्शित झाले नसल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे एकूण शंभरच्या आसपास मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचं दिसतं. तसंच यात चित्रीकरण सुरु असलेल्या सिनेमांची भर देखील पडणार आहे. येत्या काळात प्रेक्षकांना विविध विषयावर भाष्य करणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ही प्रेक्षकांना पर्वणी आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण या सर्व सिनेमांच्या प्रदर्शनाचं वेळापत्रक आखणं हे सिनेनिर्मत्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. नव्याची सुरुवात दिग्दर्शक , , , प्रकाश कुंठे, मकरंद माने, प्रसाद ओक, निखिल महाजन आदी दिग्दर्शकांनी आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाचं काम पूर्ण केलं आहे. तर दिग्दर्शक रवी जाधव, अभिजीत देशपांडे आणि विजू माने त्यांच्या आगामी सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. लॉकडाउन पश्चात सेन्सॉर झालेले मराठी चित्रपट महिना: सिनेमे जुलै: ६ ऑगस्ट: १३ सप्टेंबर: १२ ऑक्टोबर: ४ नोव्हेंबर: १२ डिसेंबर: २६ जानेवारी २०२१: १० एकूण: ८३ चित्रपट


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bXjX5s