मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांमध्ये करोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सेटवर योग्य काळजी न घेतल्यानं किंवा करोना नियमांचं काटेकोर पालन न केल्यानं सेलिब्रेटींमध्ये करोनाच्या संक्रमणाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. लोकप्रिय टीव्ही 'तारक मेहता'ला सुद्धा याचा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये दयाबेनच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मयुर वकानी यांनी करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या शोमधील आणखी एका कलाकाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं टीमच्या चिंतेत वाढ झाली आहे. लोकप्रिय शो 'तारक मेहता'मध्ये भिडेंची भूमिका साकारणारे अभिनेता यांना करोनाची लागण झाली आहे. मंदार चांदवडकर यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी कुटुंबासह स्वतःला घरीच क्वारंटाइन करून घेतलं आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. आपल्याला करोनाची लागण झाली आहे मात्र हे एसिप्म्टोमॅटिक असून आपण योग्य ती सर्व काळजी घेत असल्याचं मंदार यांनी सांगितलं. मंदार चांदवडकर यांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं की, 'माझे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र त्याआधी मला याची कोणतीही लक्षण दिसली नव्हती. हे एसिप्म्टोमॅटिक आहे. मी योग्य ती सर्व काळजी घेत आहे. BMC नं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन मी करत आहे. माझं आरोग्य ठीक आहे. माझे करोना रिपोर्ट येण्याआधीच मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं होतं. कारण मी करोना बाधित आहे अशी शंका मला आली होती. माझी फॅमिली सुद्धा क्वारंटाइन असून सर्वजण स्वतःची काळजी घेत आहेत.' मंदार चांदवडकर यांच्या आधी या शोमधील मयुर वकानी यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. दरम्यान मयुर वकानी यांची पत्नी सुद्धा करोना संक्रमित आहे. मात्र त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. एकमागोमाग एक असे दोन कलाकार करोना संक्रमित झाल्यानं 'तारक मेहता'च्या टीमची चिंता वाढली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cOHAOi