मुंबई: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचे चाहते जगभरात आहे. प्रियांकानं तिच्या अभिनयाचा जलवा बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत दाखवला आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी प्रियांका अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकत्याच चाहत्यांसाठी ट्वीटवर घेतलेल्या प्रश्नोत्तरांच्या एका सेशनमध्ये एका चाहत्यानं प्रियांकाकडे त्याला लग्नाला न बोलवल्याबाबत तक्रार केली ज्यावर प्रियांकानं त्याला मजेदार उत्तर दिलं. प्रियांकाचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका चोप्रानं नुकतंच तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी #AskPCJ सेशन ठेवलं होतं. ज्यात अनेक चाहत्यांनी आपले प्रश्न प्रियांकाला विचारले आणि तिनंही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण या सर्वात एका चाहत्याचं ट्वीट मात्र सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चाहत्यानं प्रियांकाला, 'तू मला तुझ्या भव्य लग्नसोहळ्याला का बोलवलं नाही? त्यावेळी मी जोधपूरच्या आसपासच होतो.' असा प्रश्न विचारला होता. ज्याचं प्रियांकानं खूपच मजेशीर उत्तर दिलं आहे. ज्यातून तिनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांकानं लग्नाला न बोलवल्याबद्दल त्याची माफी मागत मी तुला ओळखत नव्हते अशी कबुली दिली. प्रियांकानं लिहिलं, 'मला माफ कर, मला वाटतं मी तुला ओळखत नाही. पण मला वाटतं तुला बोलवणं फायद्याचं आणि योगदानकारक ठरलं असतं.' प्रियांकानं यासोबत हसणारा इमोजी पोस्ट करत आपलं उत्तर पूर्ण केलं. अमेरिकन गायक निक जोनस यांच्यासोबत २०१८मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली. या दोघांच्या लग्नाचा भव्य सोहळा जोधपूरच्या उमेदभवन पॅलेस येथे पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो बऱ्याच काळानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dg9jHX