मुंबई- देशासह राज्यातही करोनचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. दिवसागणिक पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बॉलिवूडमध्येही एका मागोमाग एक कलाकारांना करोनाची लागण होत आहे. कार्तिक आर्यन, आमिर खान, आर. माधवन, मिलिंद सोमण या कलाकारांच्या यादीमध्ये आता ज्येष्ठ अभिनेते आणि नेते यांचाही समावेश झाला आहे. याबाबत स्वतः परेश रावल यांनी ट्वीट करून माहिती दिली. अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करत स्वत: करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. परेश यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'माझा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या १० दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया करोनाची चाचणी करून करावी.' लस घेऊनही झाला करोना! परेश रावल यांनी ९ मार्च रोजी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यावेळी ट्वीट करत त्यांनी याची माहिती चाहत्यांना दिली होती. रावल यांनी लस घेतानाचा फोटोदेखील शेअर केला होता. ' V फॉर व्हॅक्सीन. सर्व डॉक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे आभार.' अशा भावना त्यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केल्या होत्या. परंतु ही लस घेऊन काही दिवस उलटत नाही तर परेश रावल यांना करोना संसर्गाची लागण झाली. परेश रावल यांच्याप्रमाणे शर्मिला टागोर, धर्मेंद्र, राकेश रोशन, अलका याज्ञिक, सतीश शहा, हेमा मालिनी, जॉनी लीवर, जितेंद्र, कमल हसन, मोहनलाल, नागार्जुन आदी कलाकारांनी करोनाची लस घेतली आहे. दरम्यान, ‘तुफान’ हा ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमात परेश रावल दिसणार आहेत. फरहान अख्तरची या सिनेमात मुख्य भूमिका असून तो एका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. तर परेश रावल यांनी या सिनेमात प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d9ThiK